"ये रे ये रे पैसा" या चित्रपटाच्या पहिल्या भागात अण्णा ही मध्यवर्ती भूमिका साकारलेल्या संजय नार्वेकरने धमाल उडवून दिली होती. साऊथ आफ्रिकेत गेलेला अण्णा "ये रे ये रे पैसा २" मध्ये भारतात परत आला आहे.
अमेय विनोद खोपकर एंटरटेन्मेंट, पर्पल बुल एंटरटेनमेंट, ट्रान्स एफएक्स स्टुडिओज आणि पॅनारोमा स्टुडिओजची निर्मिती असलेल्या "ये रे ये रे पैसा २" या चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत ढोमेने केले आहे.

धमाल अशा विनोदी मीम्समधून 'अण्णा परत येतोय' अशी वर्दी देण्यात आली होती. पण हा अण्णा कोण, त्याचे मीम्स, सेलिब्रेटिसचे व्हिडीओ का केले आहेत हे कळायला काही मार्ग नव्हता. त्यामुळे या अण्णाविषयी कुतूहल तयार झाले होते. अखेरीस अण्णा कोण या प्रश्नाचे उत्तर आता सापडले असून आता लवकरच "ये रे ये रे पैसा २" हा चित्रपट निखळ मनोरंजन करण्यासाठी ९ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.