मुंबई - धमाल ट्रेलर आणि 'गल्ला करदी' या गाण्यानंतर सैफ अली खानच्या आगामी 'जवानी जानेमन'चे नवे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. रोमँटिक - कॉमेडी या जॉनरमध्ये बसणाऱ्या या चित्रपटाच्या ट्रेलरला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात सैफ अली खानसोबत अलाया फर्निचरवाला ही अभिनेत्री बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.
अलाया एफ. ही अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी आहे. अलीकडेच तिने तिचे नाव बदलले आहे. यापूर्वी ती आलिया फर्निचरवाला म्हणून ओळखली जात होती. आता तिने तिचे नाव अलाया केले आहे.
हेही वाचा -'चेहरे' चित्रपटाची रिलीझ डेट पुन्हा बदलली, 'गुलाबो सिताबो' चित्रपटासोबतची टक्कर टळली
'जवानी जानेमन' या चित्रपटात अलाया सैफच्या मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर, अभिनेत्री तब्बूचीही यामध्ये खास भूमिका पाहायला मिळणार आहे.
-
Arriving on 31 Jan 2020... New poster of #JawaaniJaaneman... Stars #SaifAliKhan, #AlayaF, #Tabu and #KubbraSait... Directed by Nitin Kakkar. pic.twitter.com/RPVRNsXtok
— taran adarsh (@taran_adarsh) January 21, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Arriving on 31 Jan 2020... New poster of #JawaaniJaaneman... Stars #SaifAliKhan, #AlayaF, #Tabu and #KubbraSait... Directed by Nitin Kakkar. pic.twitter.com/RPVRNsXtok
— taran adarsh (@taran_adarsh) January 21, 2020Arriving on 31 Jan 2020... New poster of #JawaaniJaaneman... Stars #SaifAliKhan, #AlayaF, #Tabu and #KubbraSait... Directed by Nitin Kakkar. pic.twitter.com/RPVRNsXtok
— taran adarsh (@taran_adarsh) January 21, 2020
नितीन कक्कर यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची निर्मिती पूजा एंटरटेनमेंट आणि सैफच्या ब्लॅक नाईट फिल्म्स अंतर्गत करण्यात आली आहे. ३१ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा -राजामौलींच्या चित्रपटात अजय देवगनची एन्ट्री, शूटिंगला सुरुवात