ETV Bharat / sitara

'सडक 2' हा सर्वाधिक डीसलाईक्स मिळालेला जगातील तिसरा व्हिडिओ - आलिया भट

महेश भट यांच्या आगामी 'सडक 2' या सिनेमाच्या ट्रेलरला सुशांतच्या चाहत्यांच्या जबरदस्त रोषाला समोर जावं लागले आहे. व्हीडिओ नावडणाऱ्यांची संख्या पसंत असणाऱ्यांपेक्षा जास्त झाली. सडक २ ट्रेलर हा जगातील तिसरा सर्वाधिक डीसलाईक्स मिळालेला व्हिडिओ आहे.

सडक 2
सडक 2
author img

By

Published : Aug 16, 2020, 2:15 PM IST

मुंबई - अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूड नेपोटिझमवरून वाद सुरू झाला. महेश भट यांच्या आगामी 'सडक 2' या सिनेमाचा ट्रेलर हॉटस्टारच्या वतीने सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला. मात्र, नेपोटिझममुळे या ट्रेलरला सुशांतच्या चाहत्यांच्या जबरदस्त रोषाला समोर जावं लागले आहे. व्हीडिओ नावडणाऱ्यांची संख्या पसंत असणाऱ्यांपेक्षा जास्त झाली. सडक २ ट्रेलर हा जगातील तिसरा सर्वाधिक डीसलाईक्स मिळालेला व्हिडिओ आहे.

सडक चित्रपटाला तब्बल 9.04 दशलक्ष डीसलाईक्स मिळाल्या आहेत. 2018 मध्ये स्वत: युट्युबने रिवाइंड संदर्भात एक व्हीडिओ शेअर केला होता. त्याला सर्वांत जास्त 18 दशलक्ष डीसलाईक्स मिळाले होते. व्हीडिओवरून वादही झाला होता. तर पॉपस्टार जस्टिन बीबरच्या 'बेबी' या गाण्याला 2010 मध्ये 11.6 दशलक्ष डीसलाईक्स मिळाले होते. नापसंती मिळणारा हा जगातील दुसरा व्हीडिओ होता. दरम्यान, याच व्हीडिओला तब्बल एक अब्जपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले होते.

सडक-2 मधील मूख्य भूमिकेतील सर्वच कलाकार स्टार किड्सपैकी एक आहेत. सुशांतच्या निधनानंतर महेश भट्ट यांना मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचं शिकार व्हावं लागलं होतं. त्यामुळे त्यांचा आणि त्यांच्या मुलींना घेऊन करण्यात आलेल्या या चित्रपटाला रोषाचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, महेश भट्ट यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. या सिनेमामध्ये जिशु सेनगुप्ता, मकरंद देशपांडे, गुलशन ग्रोव्हर, प्रियंका बोस, मोहन कपूर आणि अक्षय आनंद देखील आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.