ETV Bharat / sitara

रियॅलिटी शोचा विजेता शिव ठाकरे म्हणतोय 'बी रिअल' आणि ‘स्टे फ्रेश’! - शिव ठाकरे डीयोड्रंट ब्रँड न्यूज

शिव ठाकरे हा मराठी मुलगा रिअ‌ॅलिटी शोमुळे रातोरात स्टार झाला. त्याच्या चाहत्यांची संख्यादेखील मोठी आहे. त्याने आता आपला स्वत:चा डीयोड्रंट ब्रँड आणला आहे.

Shiv Thakare
शिव ठाकरे
author img

By

Published : Feb 15, 2021, 9:19 AM IST

मुंबई - टेलिव्हिजनवरील रियॅलिटी शोजचे एक वैशिष्ठ म्हणजे यात भाग घेतलेला सामान्य माणूस एका रात्रीत स्टार बनू शकतो. मराठी बिगबॉस सीजन-२मध्ये शिव ठाकरे एक स्पर्धक म्हणून आला होता व संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका बनला. त्याने मराठी बिगबॉस सीजन २ चे विजेतेपद देखील पटकावले. त्यावेळी सह-स्पर्धक वीणा जगताप बरोबरच्या जवळीकीमुळे तो चर्चेत होता. सध्या तो एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला आहे. ‘आपला माणूस’ या हॅशटॅगने विशेष ओळखल्या जाणा-या शिवने स्वतःच्या ‘बी-रियल’ ब्रँडची घोषणा केली आहे. सोशल मिडिया साईटवर त्याने ‘बी-रियल’चा लोगो शेअर करत, याची माहिती दिली.

शिव ठाकरेच्या ‘बी-रियल’  ब्रँडचा लोगो
शिव ठाकरेच्या ‘बी-रियल’ ब्रँडचा लोगो
शिव एक कोरिओग्राफर असून त्याला व्यायामाचीदेखील आवड आहे. इतर ब्रँडचे डियो वापरण्यापेक्षा आपणच स्वतःचा डीयो का बनवू नये हा विचार शिवच्या मनात चमकून गेला. या कल्पनेतूनच त्याचा ‘बी-रियल’ डियो अस्तित्वात आला. बी रीयल हा एक डीयोड्रंट ब्रँड असून, नेहमीच उत्साही आणि फ्रेश राहणाऱ्या शिव ठाकरेचा हा डीओड्रंट फंडा त्याच्या चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे. ‘आपण पाहतो की, ऑफिसला जाणारी मंडळी दिवसभर फ्रेश राहण्यासाठी डीओचा वापर करतात. सामान्य माणसाला आपल्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी दिवसभर फ्रेश राहण्यास हा डीओ मदत करेल. बी रियलची टॅगलाईन ‘सेलिब्रेट हसल’ ही याच कारणामुळे ठेवण्यात आली आहे. केवळ ऑफिसला जाणारी व्यक्तीच नव्हे तर इतरांनी देखील दिवसभर फ्रेश राहण्यासाठी बी रियलचा वापर करावा,' असे शिव म्हणाला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.