मुंबई - रणवीर सिंग आपल्या उदारतेबद्दल ओळखला जातो. याचा अनुभव मँचेस्टरमध्ये आला. भारत विरुध्द पाकिस्तान यांच्या विश्वचषकातील चुरशीचा सामना रविवारी मँचेस्टरच्या मैदानात खेळला गेला. यासाठी रणवीर हजर होता. त्याने भरपूर मस्ती करत भारतीय संघाला प्रोत्साहन दिले. या सामन्यात भारताने विजय मिळवीत पाकिस्तानी संघाला धुळ चारली. यामुळे मैदानातील पाकिस्तान फॅन्स निराश झाले. यांचे सांत्वन करायला पुढे झाला तो रणवीर सिंग. त्याचा हा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.
- View this post on Instagram
#RanveerSingh COMFORTING A PAKISTANI FANNNN!!! WE LOVEEEE YOUUUU 😍😍😍😍😍💕💕💕💕💕
">
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी प्रेक्षक निराश झालेला दिसतो. पराभवानंतर त्याच्या डोळ्यात अश्रू भरले होते. त्याला पाहून रणवीर जवळ गेला. त्याला मिठी मारली आणि सांत्वनपर चार शब्द बोलला. यावेळी पराभव झाला असला तरी पुढच्यावेळी विजय मिळेल असा दिलासा त्याने दिला.
व्हायरल झालेला हा व्हिडिओ शोशा इन्स्टाग्रामवरुन व्हायरल झाला आहे. रणवीर सिंग सध्या '८३' या चित्रपटात क्रिकेटरची भूमिका साकारतोय. १९८३ मध्ये कपील देवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विश्वचषक जिंकला होता. या एतिहासिक विजयाची गाथा सांगणाऱ्या '८३' या चित्रपात रणवीर सिंग कपील देवची भूमिका साकारत आहे.