धर्मेंद्र अन् लिना चंदावरकर यांच्यासोबत केलेल्या लिपलॉकमुळे चर्चेत आले होते राम जेठमलानी - एक कुवारा एक कुवारी film
एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी सर्वांसमोर लिना चंदावरकर यांना लिपलॉक किस केलं होतं. या लिपलॉकची चर्चा तेव्हा प्रचंड गाजली होती. कारण, यापूर्वी त्यांनी २०१४ मध्ये धर्मेंद्र यांनाही एका कार्यक्रमादरम्यान लिपलॉक किस केलं होतं.

मुंबई - वरिष्ठ वकील राम जेठमलानी यांचे आज (८ सप्टेंबर) वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले आहे. ते सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ विधीज्ञ होते. आपल्या करिअरमध्ये ते त्यांच्या खटल्यांमुळे तर चर्चेत राहायचे. मात्र, आणखी एका कारणामुळे बॉलिवूडमध्येही त्यांची चर्चा झाली होती. अभिनेता धर्मेंद्र आणि अभिनेत्री लिना चंदावरकर यांना सर्वांसमोर त्यांनी केलेल्या लिपलॉकमुळे चर्चेत आले होते.
एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी सर्वांसमोर लिना चंदावरकर यांना लिपलॉक किस केलं होतं. या लिपलॉकची चर्चा तेव्हा प्रचंड गाजली होती. कारण, यापूर्वी त्यांनी २०१४ मध्ये धर्मेंद्र यांनाही एका कार्यक्रमादरम्यान लिपलॉक किस केलं होतं.
हेही वाचा-माजी कायदेमंत्री, ज्येष्ठ विधीज्ञ राम जेठमलानी यांचे निधन
लिना चंदावरकर या ७० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री होत्या. त्यांनी 'मेहबुब की मेहंदी', 'हमजोली', 'एक कुवारा एक कुवारी', यांसारखे बरेच सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. राम जेठमलानी यांनी किस केल्यामुळे त्यांचीदेखील बरीच चर्चा झाली होती.