मुंबई - पंतप्रधान मोदींनी महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या सोहळ्याला बॉलिवूडच्या बऱ्याच कलाकारांनी हजेरी लावली होती. मात्र, या सोहळ्यात फक्त हिंदी कलाकारांनाच का आमंत्रित करण्यात आलं. दाक्षिणात्य सिनेकलाकारांना का आमंत्रण दिलं गेलं नाही, अशी खंत दाक्षिणात्य सिनेस्टार रामचरण याची पत्नी उपासना कामिनेनीने केली आहे. या सोहळ्यात दाक्षिणात्य सिनेसृष्टीला दुर्लक्षित करण्यात आलं, असेही तिने म्हटलं आहे.
'प्रिय नरेंद्र मोदीजी, भारताच्या दक्षिण भागात राहणारे आम्ही तुमचं फार कौतुक करतो. तसंच पंतप्रधान म्हणून तुमच्यासारखी व्यक्ती लाभल्याचा आम्हाला अभिमान आहे. दिग्गज व्यक्तीमत्त्व आणि सांस्कृतिक प्रतीकांचे प्रतिनिधित्व केवळ हिंदी कलाकारांपुरतेच मर्यादित राहिले आहे. याबाबतीत दाक्षिणात्य कलाकार आणि दाक्षिणात्य इंडस्ट्री दुर्लक्षित राहिली असं आम्हाला वाटतं. मी माझ्या भावना दु:खी मनाने व्यक्त करत असून या गोष्टीला योग्य प्रकारे विचारात घेतली जाईल, अशी आशा व्यक्त करते', असं उपासनाने या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा -'पहला वोट पहला प्यार', धमाल रॅपच्या माध्यमातून मुंबईच्या रॅपर्सचं मतदानासाठी आवाहन
सुत्रांच्या माहितीनुसार, या कार्यक्रमात फक्त एकाच तेलुगू सिनेसृष्टीतील व्यक्तीचा समावेश होता.
हेही वाचा -स्वत:ला फिट ठेवण्यासाठी जेनेलिया करते 'अशी' कसरत, पाहा व्हिडिओ