दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत पुन्हा एकदा वरबाप होत आहेत. त्यांची मुलगी सौंदर्या ही दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार आहे. तिने ट्विटरवर एक फोटो शेअर करून याबाबत माहिती दिली आहे. सौंदर्या ही उद्योगपती विशागन वनानगामुडी यांच्यासोबत लग्नगाठ बांधणार आहे.
#OneWeekToGo #BrideMode #Blessed 😊😊😊🙏🏻🙏🏻🙏🏻 #VedVishaganSoundarya #Family ❤️❤️❤️ pic.twitter.com/fJYkHp8J1l
— soundarya rajnikanth (@soundaryaarajni) February 4, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#OneWeekToGo #BrideMode #Blessed 😊😊😊🙏🏻🙏🏻🙏🏻 #VedVishaganSoundarya #Family ❤️❤️❤️ pic.twitter.com/fJYkHp8J1l
— soundarya rajnikanth (@soundaryaarajni) February 4, 2019#OneWeekToGo #BrideMode #Blessed 😊😊😊🙏🏻🙏🏻🙏🏻 #VedVishaganSoundarya #Family ❤️❤️❤️ pic.twitter.com/fJYkHp8J1l
— soundarya rajnikanth (@soundaryaarajni) February 4, 2019
सौंदर्याने शेअर केलेल्या या फोटोत ती वधूच्या रुपात दिसत आहे. 'लग्नाला केवळ एकच आठवडा बाकी आहे', असे तिने या फोटोवर कॅप्शन दिले आहे. ११ फेब्रुवारीला तिचा विवाहसोहळा पार पडणार आहे.
सौंदर्याने २०१० साली उद्योजक अश्विन यांच्यासोबत विवाह केला होता. मात्र, त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. त्यांना ५ वर्षाचा मुलगाही आहे. मागच्या वर्षीच दोघांनीही घटस्फोट घेतला. दुसरीकडे विशागन यांचेही हे दुसरे लग्न आहे. एका वृत्तापत्राची संपादिका कनिखा कुमारन त्यांची पत्नी होती. त्यांचेही लग्न फार काळ टिकले नाही.