ETV Bharat / sitara

रजनीकांत राजकारणात येणार की नाही?, सस्पेन्स कायम - रजनीकांत मक्कल मंड्राम

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीबाबत कोणती भूमिका घेणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले होते. रजनीकांत यांनी त्यांच्या रजनीकांत मक्कल मंड्राम जिल्हा सचिवांसोबत सल्लागार बैठक घेतली. मात्र कोणताही ठोस निर्णय त्यांनी घेतलेला नाही.

advisory committee
सल्लागार समितीच्या बैठकीकडे वेधले देशाचे लक्ष
author img

By

Published : Nov 30, 2020, 1:02 PM IST

Updated : Nov 30, 2020, 1:27 PM IST

चेन्नई - गेले काही वर्षे सुपरस्टार रजनीकांत तामिळनाडूच्या राजकारणात सक्रिय होणार अशी चर्चा आपण ऐकत आलो आहोत. या पार्श्वभूमीवर त्यांनी रजनीकांत मक्कल मंड्राम या राजकीय पक्षाची घोषणाही केली होती. मात्र अद्याप त्यांनी एकही निवडणुकीत सहभाग घेतला नव्हता. मात्र २०२१मध्ये तामिळनाडूत विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. यासाठी आपला पक्ष कोणती राजकीय भूमिका बजावणार यासाठी रजनीकांत यांनी सल्लागार समितीची बैठक आज आयोजित केली होती.

रजनीकांत यांची पक्षाच्या सचिवां बरोबर बैठक पार पडली. त्या बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांनी रजनीकांत यांना पुढील निर्णय घेण्याचे सर्वाधिकार दिले. त्यानुसार लवकरच निर्णय घेणार असल्याचे रजनीकांत यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आज ते आपल्या राजकीय प्रवेशाबाबतची ठोस घोषणा करू शकले नाहीत.

हेही वाचा - 'ईडी, सीबीआयला सीमेवर पाठवा; पाक आणि चीन शरण येईल'

तामिळनाडू विधानसभा निवडणूक लढवण्याबाबतचा निर्णय ते या बैठकीत घेणार असल्यामुळे देशाचे लक्ष त्यांच्या भूमिकेकडे लागून राहिले होते.

यापूर्वी रजनीकांत यांनी जाहीर केले की, आपण एक राजकीय पक्ष सुरू करणार आणि २०२१ च्या विधानसभा निवडणूक लढवणार. मात्र, पक्ष सक्रिय करण्यासाठी त्यांच्याकडून कोणतेही काम झालेले नाही.

रजनीकांत यांनी डिसेंबर २०१७मध्ये तामिळनाडूत राजकीय पक्ष स्थापन करत असल्याची घोषणा केली होती. मात्र लोकसभा नि़वडणुकांमध्ये रजनीकांत यांनी सहभाग घेतला नव्हता. पण आता होणारी विधानसभा निवडणूक ते लढवणार असल्याची चर्चा रंगली असून त्याच पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले होते.

हेही वाचा - 'शेतकरी आहेत म्हणून देश आहे; मोदींनी त्यांच्याशी चर्चा करायला हवी..'

Last Updated : Nov 30, 2020, 1:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.