ETV Bharat / sitara

‘गेम ऑफ थ्रोन्स’च्या थीम साँगवर पुर्वी भावेने केला भरतनाट्यम डान्स - Bharatnatyam

अभिनेत्री पुर्वी भावेचे पहिले डान्स कवर झाले रिलीज...‘गेम ऑफ थ्रोन्स’च्या थीम साँगवर तिने केला भरतनाट्यम डान्स...युध्द, पक्षी, प्राणी या मुद्रा दाखवण्याचा प्रयत्न...

पुर्वी भावेने केला भरतनाट्यम डान्स
author img

By

Published : Apr 15, 2019, 7:35 PM IST

‘गेम ऑफ थ्रोन्स’ या वेबमालिकेचे जगभरात असंख्य चाहते आहेत. यात अनेक बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीतले कलाकारही सामील आहेत. गेले अनेक दिवस हे चाहते शेवटच्या सिझनची मालिका येण्याची वाट पाहत होते. मालिका आल्यावर ती पाहतानाचे फोटो आणि व्हिडीओज अनेकांनी सोशल मीडिवरून शेअरही केले.

अभिनेत्री-नृत्यांगना पुर्वी भावेही 'गेम ऑफ थ्रोन्स'ची चाहती आहे. तिने मालिकेच्या शेवटच्या सिझनचे स्वागत थोडे आगळ्या पध्दतीने केले आहे. पुर्वीने भरतनाट्यम नृत्याव्दारे या मालिकेला मानवंदना दिली आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

पुर्वी भावे सांगते, “मी गेम ऑफ थ्रोन्स मालिकेची खूप मोठी चाहती आहे. ‘ग्रेम ऑफ थ्रोन्स’चे टायटल थीम ट्रॅक कुठेही ऐकले की लगेच माझे कान टवकारले जातात. या थीम साँगवर मी मनातल्या मनात मालिका पाहताना खूपदा कोरीओग्राफीही केली होती. आणि शेवटच्या सिझनची घोषणा झाल्यावर गेले काही दिवस ब्रेक ऑफ रिएलिटी’ गाणे माझ्या मनात रूंजी घालत होते.“

ती पूढे सांगते, “मी गेले काही दिवस कन्टेम्पररी भरतनाट्यमची एक सीरीज यृट्यूबवर घेऊन येण्याचे प्लॅन करत होते. मग मनातं आलं, की, ‘ब्रेक ऑफ रिएलिटी’ या गेम ऑफ थ्रोन्सच्या थीम साँगच्या वर्जनवर पहिलं कवर करावं आणि मग या कल्पनेला सत्यात उतरवलं.”

पुर्वी म्हणते, “शास्त्रीय नृत्य आजच्या तरूणाईला आपलंसं वाटलं पाहिजे, हा विचार ही कन्टम्पररी क्लासिक डान्स मालिका घेऊन येण्यामागे मी केला आहे. त्यातच ‘गेम ऑफ थ्रोन्स’ला निवड्यामागे अजून एक कारण आहे. भरतनाट्यममध्ये युध्द, पक्षी, प्राणी यावर खूप सुंदर मुद्रा आहेत. या नृत्यशैलीतून ड्रगन, व्हाइट वॉकर्स यासारख्या गोष्टी चांगल्या पध्दतीने मांडल्या जाऊ शकतात."

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.