ETV Bharat / sitara

प्रियांकाने होणाऱ्या वहिनीला इन्स्टाग्रामवर केलं अनफॉलो, चर्चांना उधाण - desi girl

'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा अलिकडेच आपल्या भावाच्या लग्नासाठी भारतात आली होती. तिचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा आणि इशिता कुमार दोघेही एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात लग्नगाठ बांधणार होते. फेब्रुवारी महिन्यात त्यांचा साखरपुडा झाला होता. मात्र, ऐनवेळी इशिताची प्रकृती खराब झाल्यामुळे त्यांचे लग्न पुढे ढकलण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

प्रियांकाने होणाऱ्या वहिनीला इन्स्टाग्रामवर केलं अनफॉलो, चर्चांना उधाण
author img

By

Published : May 3, 2019, 12:44 PM IST

मुंबई - 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा अलिकडेच आपल्या भावाच्या लग्नासाठी भारतात आली होती. तिचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा आणि इशिता कुमार दोघेही एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात लग्नगाठ बांधणार होते. फेब्रुवारी महिन्यात त्यांचा साखरपुडा झाला होता. मात्र, ऐनवेळी इशिताची प्रकृती खराब झाल्यामुळे त्यांचे लग्न पुढे ढकलण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. मात्र, आता समोर आलेल्या माहितीनुसार सिद्धार्थ आणि इशिता यांच्यात काहीतरी बिनसले आहे, असे बोलले जात आहे.

Priyanaka chopra unfollow Ishita kumar on Instagram
फेब्रुवारी महिन्यात सिद्धार्थ आणि इशिता कुमार यांचा साखरपुडा झाला होता.

एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, इशितावर अचानक सर्जरी करावी लागणार होती. त्यामुळे त्यांचे लग्न पुढे ढकलले. इशिताने हॉस्पिटलमधला फोटोही तिच्या इन्स्टग्रामवर शेअर केला होता. 'या सर्जरीतून आता बरी झाली आहे. खूप वेदनादायी होती. पण, आता ठिक आहे', असे तिने या फोटोवर कॅप्शन दिले होते.

इशिताने इन्स्टाग्राम अकाऊंट डिलीट करण्यापूर्वी एक फोटो शेअर करून लिहिले होते, की 'आता नवी सुरूवात होणार आहे. एका सुंदर शेवटाला गुडबाय किस'. तिच्या या फोटोवर तिची आई निधी चोप्रा यांनीही कमेंट करत लिहिले होते, की 'जुने पुस्तक बंद कर आणि नवी कथा लिहण्यास सुरुवात कर'. तर वडीलांनीही लिहिले होते, की 'आम्ही तुझ्यासोबत आहोत'.

social media post of ishita kumar
इशिताची सोशल मीडिया पोस्ट

त्यानंतर आता मात्र सिद्धार्थ आणि इशिता यांच्यात काहीही ठिक नसल्याचे बोलले जात आहे. कारण, इशिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून सिद्धार्थसोबतचे सर्व फोटो डिलीट केले आहेत. तसेच, तिचे इन्स्टाग्राम अकाऊंटही डिलीट केले आहे. विशेष म्हणजे, प्रियांकानेही अमेरिकेला परत गेल्यावर इशिताला अनफॉलो केले आहे. त्यामुळे आता सिद्धार्थ आणि इशिता लग्न करणार नाहीत, अशा चर्चा माध्यमांमध्ये सुरू आहेत. या सर्व चर्चांवर प्रियांकाने अद्याप कोणतीही प्रतिक्रीया दिलेली नाही.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.