ETV Bharat / sitara

पूजा हेगडेच्या वाढदिवसानिमित्त प्रभासकडून खास भेट, ‘राधेश्याम’मधील फर्स्ट लूक रिलीज - प्रभासने पूजा हेगडेला दिल्या शुभेच्छा

अभिनेत्री पूजा हेगडे आपला ३० वा वाढदिवस साजरा करीत आहे. यानिमित्ताने निर्मात्यांनी ‘राधेश्याम’ या चित्रपटातील तिचा फर्स्ट लूक प्रसिध्द केला आहे. या चित्रपटात ती अभिनेता प्रभाससोबत झळकणार आहे.

Pooja Hegde
पूजा हेगडे
author img

By

Published : Oct 13, 2020, 7:11 PM IST

मुंबई - अभिनेता प्रभासचा आगामी सिनेमा ‘राधेश्याम’ ही मॅग्नम ओपस म्हणून युरोपमध्ये घडणारी एक महाकाव्य प्रेमकथा आहे. या चित्रपटात पॅन इंडिया स्टार प्रभास आणि पूजा हेगडे मुख्य भूमिकेत आहेत. पूजा हेगडे हिच्या वाढदिवसानिमित्त निर्मात्यांनी चित्रपटातील तिचा फर्स्ट लूक प्रसिध्द केला आहे.

आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत प्रभासने आपल्या 'प्रेरणे'ची ओळख सर्वांसमोर ठेवली. ऑलिव्हच्या हिरव्या रंगातील कपड्यामध्ये पूजा सुंदर हास्यासह ट्राममध्ये बसलेली दिसत आहे.

"पूजा हेगडे आपल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा," असे लिहित प्रभासने पूजाला शुभेच्छा दिल्या आहेत.

'राधेश्याम' हा त्रिभाषिक चित्रपट असेल आणि गुलशन कुमार आणि टी-सीरिजची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन राधा कृष्ण कुमार करणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.