हिंदुस्थान युनिलिव्हर या कंपनीने आपल्या 'फेअर अँड लव्हली' या फेसक्रीमच्या नावातून 'फेअर' हा शब्द वगळण्याचा निर्णय घेतला आहे. बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. तर मराठी अभिनेत्री देखील यात मागे नाहीत. अभिनेत्री जुई गडकरीने तिच्या सोशल मीडिया अकौंटद्वारे या निर्णयाच स्वागत केलं आहे.
'पुढचं पाऊल' मधील कल्याणी आणि रिऍलिटी शो 'बिग बॉस' मुळे ती सध्या एक यशस्वी टीव्ही अभिनेत्रीमध्ये गणली जाते. जुई दिसायला गव्हाळ रंगाची असली तरीही मिट्ट गोरी नाही, त्यामुळे ज्या मराठी इंडस्ट्रीत तिने काम करून नाव कमावलं आहे तिथे नक्की गोरेपणाला किती महत्व आहे..? ज्या इंडस्ट्रीत सावळ्या रंगाच्या मुलीची गोष्ट सांगतानादेखील गोरी मुलगी कास्ट करून तिला टॅन केलं जातं. आशा ठिकाणी काम करताना तिला नक्की काय अनुभव आलेत, समाजात आज गोरेपणाला किती महत्त्व आहे..? आणि उद्या एखाद्या फेसक्रीम कंपनीने जुईला बक्कळ पैसे देऊन जाहिरात करण्याची विचारणा केली तर व्यावसायिक अभिनेत्री म्हणून ती ही जाहिरात करणार की नाही..?
हेही वाचा - 'फेअर अँड लव्हली' क्रीमचे नाव बदलणार, 'फेअर' शब्द हटवण्याने सुटणार का प्रश्न?
या सगळ्या विषयावर जुईने 'ई टीव्ही भारत'शी संवाद साधून आपली मतं व्यक्त केली आहेत..या विषयावर तिच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी विराज मुळे यांनी..