मुंबई - अभिनेता सनी देओलचा मुलगा करण देओल हा बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. 'पल पल दिल के पास' या चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाची नवी रिलीज डेट नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या चित्रपटात करणसोबत साहिर बांबा ही नवोदीत अभिनेत्री झळकणार आहे.
'पल पल दिल के पास' हा चित्रपट २० सप्टेंबर २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन खुद्द सनी देओल करत आहे. तर, 'झी' स्टुडिओअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे.
चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी याबाबतची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे.