ETV Bharat / sitara

या दोघांचा 'बँड-बाजा' वाजणार २० मार्चला... यायला लागतंय लग्नाला!!

author img

By

Published : Jan 29, 2020, 6:43 PM IST

'वाजवुया बँड बाजा' या चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज झाले आहे. विनोदी चित्रपट असलेल्या या चित्रपटात अभिनेता समीर धर्माधिकारी पहिल्यांदाच एका विनोदी भूमिकेत दिसणार आहे. तर, मंगेश देसाई देखील महत्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

vajvuya-band-baja
वाजवुया बँड बाजा

मुंबई - राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांचा 'वाजवुया बँड बाजा' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे पहिल्या पोस्टरची प्रत पुण्यातील 'दगडूशेठ हलवाई गणपती'च्या चरणी या पोस्टरची पहिली प्रत वाहण्यात आली होती. आता या चित्रपटाचे नवीन पोस्टर भेटीस आले आहे.

'वाजवुया बँड बाजा' निर्माते अमोलकागणे यांनी चित्रपटाचे नवे पोस्टर शेअर केलंय. याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी, ''या दोघांचा बँड-बाजा वाजणार २० मार्च २०२० ला.तुम्हा सगळ्यांना यायला लागतंय लग्नाला!!'' लिहिलंय.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

तीन भावांच्या आयुष्यातल्या गमती-जमतींवर आधारलेली 'वाजवुया बँड बाजा'ची मजेशीर कथा संदीप नाईक यांनी लिहिली आहे. तर, प्रसंगानुरूप हास्याची कारंजे उडवणारी पटकथा तसेच संवाद निशांत नाथराम धापसे यांनी लिहिली आहेत. निसर्गरम्य वातावरणात शूट करण्यात आलेल्या या सिनेमाची सिनेमॅटोग्राफी नागराज दिवाकर यांनी केली आहे. शिवाय या प्रेमकथेला खरा साज चढवलाय तो 'वाजवुया बँड बाजा; या चित्रपटातील गाण्यांनी. विजय गटलेवार आणि राहुल मिश्रा यांच्या संगीत लहरींवर गायक-आदर्श शिंदे यांच्या स्वरांनी तर चारचाँद लावले आहेत.

'वाजवुया बँड बाजा'चा विषय प्रत्येक वयोगटातील तरुण मंडळींना आवडणारा असा आहे. मनाने तरुण असणाऱ्यांना आपल्या गतकाळातील प्रेमाची तर युवा पिढीला आपल्या चालू अफेअरच्या आठवणींत रमायला भाग पाडणारा हा चित्रपट असल्याचे निर्माते अमोल कागणे आणि दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी म्हटले आहे.

'वाजवुया बँड बाजा' हा चित्रपट २० मार्च २०२० ला प्रदर्शित होणार आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.