मुंबई - अभिनेता नील नितीन मुकेश लवकरच 'बायपास रोड' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्याच प्रोडक्शन हाऊसमध्ये या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. नुकतेच या चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.
नील नितीन मुकेशने आत्तापर्यंत बॉलिवूडमध्ये बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे. लवकरच तो प्रभास आणि श्रद्धा कपूरसोबत 'साहो' चित्रपटात झळकणार आहे. त्यानंतर तो लगेचच 'बायपास रोड' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नमन नितिन मुकेश हे करत आहेत. तर, मिराज ग्रुप आणि एनएनएम फिल्म्स अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे.
हा चित्रपट एक अॅक्शन थ्रिलरपट असणार आहे. यामध्ये कोणत्या अभिनेत्रीची वर्णी लागणार आहे, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी या चित्रपटाबाबतची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे.