मुंबई - राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त 'टर्टल' या चित्रपटाला रिलीज करण्याचे मोठे साहस निर्मात्याला करावे लागत आहे. निर्माता अशोक चौधरी यांनी याचा खुलासा केला आहे.
'टर्टल' सिनेमात संजय मिश्रा यांची प्रमुख भूमिका आहे. हा एक राजस्थानी चित्रपट आहे. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असला तरी वितरक मिळत नसल्यामुळे चित्रपट रिलीज होऊ शकलेला नाही.
निर्माता अशोक चौधरी म्हणाले, ''राजस्थानी चित्रपटाच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय. जगातील १९५ देशांची गंभीर समस्या असलेल्या पाणी तुटवड्याच्या समस्येवर या चित्रपटाची कथा आहे. आम्ही टॉपचे स्थान मिळवूनही चित्रपटगृहात प्रेक्षक पाहून शकत नाहीत है दुर्दैवी आहे.''
राजस्थानीत गंभीर पाणी समस्येभोवती चित्रपटाची कथा गुंफण्यात आली आहे.