ETV Bharat / sitara

'जर्सी' चित्रपटाच्या रिमेकमध्ये शाहिदसोबत 'या' मराठी अभिनेत्रीची वर्णी

चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. २८ ऑगस्ट २०२० ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

'जर्सी' चित्रपटाच्या रिमेकमध्ये शाहिदसोबत 'या' अभिनेत्रीची वर्णी
author img

By

Published : Nov 19, 2019, 5:21 PM IST

मुंबई - दाक्षिणात्य सिनेसृष्टीत सुपरहिट ठरलेल्या 'अर्जून रेड्डी' या चित्रपटाचा हिंदी रिमेक 'कबिर सिंग'नंतर शाहिद कपूर पुन्हा एकदा एका तेलुगू रिमेकमध्ये झळकणार आहे. 'जर्सी' असे या चित्रपटाचे नाव आहे. काही महिन्यांपूर्वीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. यामध्ये शाहिद कपूरसोबत कोणती अभिनेत्री भूमिका साकारणार हे देखील जाहीर झाले आहे.

'सुपर ३०' आणि 'बाटला हाऊस' या चित्रपटात भूमिका साकारणारी अभिनेत्री मृणाल ठाकूर या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटात शाहिद क्रिकेटरची भूमिका साकारणार आहे. हिंदीमध्येही या चित्रपटाचे शिर्षक 'जर्सी' असेच राहणार आहे.

हेही वाचा -'बागी ३'च्या सेटवरील टायगरची पहिली झलक, शेअर केला फोटो

चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. २८ ऑगस्ट २०२० ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

अलू अरविंद, अमन गील आणि दिल राजू हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.

मृणालने छोट्या पडद्यावरुन आपल्या अभिनयाची सुरूवात केली होती. त्यानंतर ती तबरेज नुरानी यांच्या 'लव्ह सोनिया' या चित्रपटामध्ये पहिल्यांदा झळकली होती. या चित्रपटातील तिच्या भूमिकेची चांगली प्रशंसा झाली होती. त्यानंतर तिला हृतिक रोशनसोबत 'सुपर ३०' आणि जॉन अब्राहम सोबत 'बाटला हाऊस' या चित्रपटामध्येही भूमिका साकारण्याची संधी मिळाली. आता ती शाहिद कपूरसोबत भूमिका साकारताना दिसणार आहे.

हेही वाचा -पाहा ट्रेलर : 'हर एक मराठा में छुपा है एक लाख मराठा' : 'तान्हाजी - द अनसंग वॉरियर'

Intro:Body:

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.