ETV Bharat / sitara

दृष्यम २ : मोहनलाल यांना आहे क्राईम थ्रिलर्सचे आकर्षण - superstar Mohanlal

मल्याळम सुपरस्टार मोहनलाल म्हणाले की, क्राईम थ्रिलर्स करणाऱ्यांबाबत त्यांना आपुलकी आहे. 'दृष्यम २' हा चित्रपट १९ फेब्रुवारीला रिलीज होतोय त्यानिमित्ताने मोहनलाल बोलत होते.

Mohanlal
मोहनलाल
author img

By

Published : Feb 12, 2021, 7:17 PM IST

मुंबई - मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांना क्राईम थ्रिलर चित्रपट आवडतात कारण या शैलीमुळे कलाकारांना आव्हानात्मक काम करण्यासाठी कौशल्य पणाला लावावे लागते.

"मला गुन्हेगारी थ्रिलर्सचे आकर्षण आहे. 'दृष्यम' सारख्या चित्रपटातून अभिनेत्याला त्याच्या अभिनय कौशल्यांना आव्हान मिळते. अनेक क्राईम थ्रिलर्स केल्यानंतरही दृष्यम १ व २ हे माझे आवडते चित्रपट आहेत.''

"यासारखा चित्रपट बनवणे आणि या प्रकारची पटकथा लिहिणे खूप अवघड आहे. मी म्हणेन की ‘दृष्यम ’१ आणि २ अत्यंत बुद्धिमान क्राईम थ्रिलर आहेत,” ते पुढे म्हणाले.

१९ फेब्रुवारी रोजी या चित्रपट मालिकेचा दुसरा चित्रपट दृष्यम चित्रपटची फ्रँचायझी पुढे घेऊन जाणार आहेत. दृष्यम या मूळ चित्रपटाचा याच नावाने हिंदीत रिमेक झाला होता. यात अजय देवगण आणि तब्बू यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या.

दृष्यम २ हा चित्रपट गीतू जोसेफ यांनी लिहिला व दिग्दर्शित केला आहे. यांनीच २०१३ मध्ये आलेल्या चित्रपटाचे संगीतही बनवले असून या चित्रपटात मीना, सिद्दीक, आशा शारथ, मुरली गोपी, अन्सिबा, एस्तेर आणि सायकुमार यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

पहिला भाग जिथून संपला तिथेपासून, हा चित्रपट आणखी थरारक कथानकासह परतण्याचे आश्वासन देतो. सिक्वेल आपल्याला जॉर्जकुट्टी (मोहनलाल यांची व्यक्तीरेखा) आणि त्याचे कुटुंबीय यांच्या त्या रात्री घडलेल्या अनुभवापासून सुरू होतो. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात कोणते बदल घडले याबद्दल कथानक पुढे सरकते.

आपल्या भूमिकेविषयी आणि चित्रपटाविषयी मोहनलाल म्हणाले: "जॉर्जकट्टी समजणे फार कठीण आहे. या अर्थाने ते एक अतिशय रंजक पात्र आहे, जर तुम्ही एखादा गुन्हा केला आणि स्वत: ला अडकण्यापासून वाचवलं तर आपणास त्या प्रकारची बुद्धिमत्ता असायला हवी. "

'दृष्यम 2' हा चित्रपट अमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज होईल.

हेही वाचा - तापसी पन्नू आणि अनुराग कश्यप 'दोबारा'साठी पुन्हा आले एकत्र

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.