मुंबई - अक्षय कुमारचा मल्टीस्टारर 'मिशन मंगल' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत आहे. अवघ्या ३२ कोटींमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने तीनच दिवसात ५० कोटीपेक्षा जास्त गल्ला जमवला आहे. हा चित्रपट अक्षयच्या करिअरमधला सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे.
१५ ऑगस्टला 'मिशन मंगल' हा चित्रपट सिनेमागृहात झळकला. पहिल्याच दिवशी २९.१६ कोटीची कमाई करत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग केली. दुसऱ्या दिवशी १७.२८ कोटी आणि तिसऱ्या दिवशी २३.५८ कोटींची कमाई करत मिशन मंगलने ५० कोटीच्या पुढे टप्पा गाठला आहे. आता या चित्रपटाची एकुण कमाई ७०.०२ कोटी इतकी झाली आहे. कमाईचे आकडे जर असेच वाढत राहिले, तर, हा चित्रपट १०० कोटीच्या पुढे कमाई करेल, असा अंदाज चित्रपट समीक्षक वर्तवत आहेत.
-
#MissionMangal witnesses superb growth on Day 3... Multiplexes of metros + Tier-2 cities are rocking... Mass circuits witness growth and should put up big numbers today [Sun]... Thu 29.16 cr, Fri 17.28 cr, Sat 23.58 cr. Total: ₹ 70.02 cr. India biz.
— taran adarsh (@taran_adarsh) August 18, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#MissionMangal witnesses superb growth on Day 3... Multiplexes of metros + Tier-2 cities are rocking... Mass circuits witness growth and should put up big numbers today [Sun]... Thu 29.16 cr, Fri 17.28 cr, Sat 23.58 cr. Total: ₹ 70.02 cr. India biz.
— taran adarsh (@taran_adarsh) August 18, 2019#MissionMangal witnesses superb growth on Day 3... Multiplexes of metros + Tier-2 cities are rocking... Mass circuits witness growth and should put up big numbers today [Sun]... Thu 29.16 cr, Fri 17.28 cr, Sat 23.58 cr. Total: ₹ 70.02 cr. India biz.
— taran adarsh (@taran_adarsh) August 18, 2019
'मिशन मंगल' हा या वर्षातला दुसरा दमदार ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटात मंगळ ग्रहावर जाण्यासाठी भारतीय वैज्ञानिकांनी कशाप्रकारे मेहनत घेतली, हे दाखवण्यात आले आहे. आता हा चित्रपट आणखी किती कमाई करतो, हे पाहणे रंजक ठरेल.