ETV Bharat / sitara

ईटीव्ही भारत विशेष : मिर्झापूर-2पेक्षा वेगळे आहे मिर्झापूर 'रियल'!

author img

By

Published : Oct 30, 2020, 4:51 PM IST

मिर्झापूर बेव सीरिजचा दुसरे पर्व प्रदर्शित झाल्यापासून चर्चेत आहे. आता पुन्हा नवीन वाद निर्माण झाला आहे. खऱ्या मिर्झापूरची ओळख मालिकेत दाखवल्यापेक्षा खूप वेगळी असून मालिकेमुळे मिर्झापूरची बदनामी होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी आणि नेत्यांनी केला आहे. मिर्झापूर भारतातील प्रमुख तीर्थ क्षेत्रांपैकी एक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याबाबत ईटीव्ही भारतचा हा विशेष रिपोर्ट...

mirzapur
मिर्झापूर

लखनऊ - मिर्झापूर हा उत्तर प्रदेशातील एक जिल्हा आहे. वाराणसीप्रमाणेच मिर्झापूर हे विंध्याचल नावाने प्रसिद्ध आहे. येथे विंध्यवासीनी देवीचे मंदिर असून लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण असलेल्या या ठिकाणी भक्ती आणि शांतीचा अनुभव मिळतो. प्रत्यक्षात मिर्झापूर असे असताना त्याला मालिकेमध्ये अपराधांचा अड्डा का दाखवले आहे? असा प्रश्न स्थानिक नागरिक आणि नेते करत आहेत. आतापर्यंत सामाजिक कार्यकर्ते, विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव, माजी केंद्रीय मंत्री आणि मिर्झापूरच्या खासदार अनुप्रिया पटेल यांनी या वेब सीरिजला विरोध केला आहे.

मिर्झापूरबाबत ईटीव्ही भारतचा विशेष रिपोर्ट

मिर्झापूरमधून निश्चित होते भारताची अंतरराष्ट्रीय प्रमाणवेळ -

प्रत्येक देशाची स्वत:ची एक प्रमाणवेळ असते. भारताची प्रमाणवेळ मिर्झापूरमधून निश्चित होते. मिर्झापूर जिल्ह्यातील अमरावती चौकातून ही प्रमाणवेळ निश्चित केली गेली आहे. मिर्झापूर "लाल स्टोन"साठीही प्रसिद्ध आहे. प्राचीन काळात या दगडांचा वापर मौर्य सम्राट अशोकाने बौद्ध स्तुप आणि अशोक स्तंभ तयार करण्यासाठी केला होता.

मिर्झापूरमध्ये आहेत विविध पर्यटन स्थळे -

विंध्याचल, अरवली आणि नीलगिरी पर्वतरांगांनी वेढलेले हे ठिकाण विंध्य नावाने ओळखले जाते. येथील चुनार किल्ला प्रसिद्ध आहे. या व्यतिरिक्त गंगा नदी, सीताकुंड, लाल भैरव मंदिर, मोती तलाव, टांडा धबधबा, विंडम धबधबा, खडजा धबधबा, लखनिया दरी, चुनादरी, सिरसी बंधारा, बकरिया धबधबा, तारकेश्वर महादेव, महात्रिकोण शिवपूर, गुरुद्वारा, गुरुवार्ता बाग आणि रमेश्वर, देवरहवा बाबा आश्रम आदि ठिकाणे प्रसिद्ध आहेत. या ठिकाणांना भेटी देण्यासाठी पर्यटक येतात.

गुन्हेगारांमुळे नाही तर 'या' लोकांमुळे आहे मिर्झापूर प्रसिद्ध -

मिर्झापूर सांस्कृतिक, धार्मिक आणि गंगा-जमुनेच्या शिस्तीचे शहर आहे. येथे आजपर्यंत एकही जातीय दंगल किंवा मारामारी झालेली नाही. या जिल्ह्यातून आजपर्यंत अनेक लेखक, संगीतकार, कलाकार, पत्रकार आणि राजकीय नेत्यांनी आपले नाव कमावले आहे. संस्कृतच्या प्रसिद्ध लेखिका पद्मश्री नाहीद आबिदी, लेखक लक्ष्मी राज शर्मा याच जिल्ह्यातील आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचीही कर्मभूमी मिर्झापूरच आहे. अलाहाबाद रेडियोवर पहिल्यांदा कजली गाणाऱ्या महिला मैनादेवी मिर्झापूरच्या होत्या. माजी प्रधानमंत्री लाल बहादुर शास्त्री यांची सासुरवाडी मिर्झापूर होते. फुलनदेवींनी सुद्धा याच ठिकाणावरून दोनदा खासदारपद मिळवले होते.

काय आहे खासदार अनुप्रिया पटेल यांचे म्हणणे?

मिर्झापूरच्या खासदार अनुप्रिया पटेल यांनी ट्विट करून म्हटले आहे, की “माननीय पंतप्रधान आणि माननीय मुख्यमंत्री मिर्झापूर विकसित शहर आहे. हे एकतेचे केंद्र आहे. मिर्झापूर नावाच्या वेबसीरिजमध्ये मिर्झापूरची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे. मिर्झापूरची खासदार या नात्याने मी याला विरोध करते आणि चौकशीची मागणी करते."

मिर्झापूर वेब सीरिजचे दुसरे पर्व 22 ऑक्टोबरला प्रदर्शित झाले आहे. यामध्ये पंकज त्रिपाठी, दिव्येंदु शर्मा, अली फजल, श्वेता त्रिपाठी, रसिका दुग्गल यांच्या भूमिका आहेत. दिग्दर्शक गुरमीत सिंग आणि मिहिर देसाई आहेत. ही सीरिज प्रदर्शित होताच सोशल मीडिया कमेंट्सचा अगदी पूर आला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.