ETV Bharat / sitara

'कबिर सिंग'साठी मीराच्या शाहिदला खास शुभेच्छा, स्क्रिनिंगदरम्यान झाली भावुक - kabir singh

चित्रपटाच्या ट्रेलरवर आणि गाण्यांवर आत्तापर्यंत चाहत्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला. शाहिदची पत्नी मीरा राजपूत हिदेखील 'कबिर सिंग'च्या स्पेशल स्क्रिनिंगदरम्यान भावुक झाली.

'कबिर सिंग'साठी मीराच्या शाहिदला खास शुभेच्छा, स्क्रिनिंगदरम्यान झाली भावुक
author img

By

Published : Jun 21, 2019, 9:13 AM IST

मुंबई - अभिनेता शाहिद कपूर आणि कियारा आडवाणी यांचा कबिर सिंग आज (२१ जून) आज प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाची स्पेशल स्क्रिनिंग मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. चाहत्यांनाही बऱ्याच दिवसापासून या चित्रपटाची आतुरता आहे. चित्रपटाच्या ट्रेलरवर आणि गाण्यांवर आत्तापर्यंत चाहत्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला. शाहिदची पत्नी मीरा राजपूत हिदेखील 'कबिर सिंग'च्या स्पेशल स्क्रिनिंगदरम्यान भावुक झाली. तिने शाहिदसाठी सोशल मीडियावर खास शुभेच्छा दिल्या आहेत.

मीराने शाहिदचा एक फोटो पोस्ट करुन त्यावर लिहिलेय, 'आ जमाने आजमाले रुठता नही, फासलो से हौसले ये तुटता नही. ही तुझी वेळ आहे', असे तिने यामध्ये म्हटले आहे.

दिग्दर्शक करण जोहरनेही शाहिदसाठी पोस्ट लिहली आहे. तसेच, 'कबिर सिंग'साठी त्याला शुभेच्छादेखील दिल्या आहेत.

'कबिर सिंग' हा दाक्षिणात्य 'अर्जून रेड्डी' या चित्रपटाचा रिमेक आहे. संदीप वांगा यांनीच या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. 'कबिर सिंग' हा प्रत्येक व्यक्तीमध्ये वसलेला असतो. फक्त त्या परिस्थितीतून वेळीच बाहेर पडणे गरजेचे असते', असे शाहिदने एका माध्यमाशी बोलताना म्हटले होते.
या चित्रपटातून कियारा आणि शाहिद पहिल्यांदाच एकत्र पडद्यावर झळकणार आहेत.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.