ETV Bharat / sitara

मिका सिंग म्हणतोय, मी मराठी माणसासाठी; मराठी गाण्याला देणार आवाज - ye re ye re paisa 2

मिका सिंग लवकरच एका मराठी गाण्याला आवाज देणार आहे. येरे येरे पैसा असं या गाण्याचं शीर्षक असणार आहे. मिका सिंगनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे.

मिका सिंग मराठी गाण्याला देणार आवाज
author img

By

Published : Jun 23, 2019, 5:12 PM IST

Updated : Jun 23, 2019, 7:50 PM IST

मुंबई - बॉलिवूडमध्ये आपल्या भारदस्त आवाजामुळे ओळखला जाणारा आणि असंख्य लोकप्रिय हिंदी गाण्यासाठी आवाज देणारा मिका सिंग लवकरच एका मराठी गाण्याला आवाज देणार आहे. येरे येरे पैसा असं या गाण्याचं शीर्षक असणार आहे. मिका सिंगनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे.

या गाण्याच्या काही ओळी गात मी मराठी माणसाठी, जय महाराष्ट्र असे तो म्हणताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये त्याच्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर आणि हेमंत ढोमेदेखील दिसत आहेत. गाणं रेकॉर्ड करण्यापूर्वी स्टूडिओमध्ये काढलेला हा व्हिडिओ आहे. संजय जाधवद्वारा दिग्दर्शित 'येरे येरे पैसा' या मराठी सिनेमाला मिळालेल्या यशानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

याच चित्रपटातील शीर्षक गीत 'येरे येरे पैसा'ला मिका आवाज देत आहे. याआधीही द मिका सिंगनं ‘डोक्याला शॉट’ या मराठी चित्रपटाच्या शीर्षक गीताला आवाज दिला आहे. यानंतर आता पुन्हा एकदा मराठी श्रोत्यांची मनं जिंकण्यासाठी मिका सज्ज झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार 'येरे येरे पैसा' चित्रपटाच्या सिक्वलचं दिग्दर्शन संजय जाधव करणार नसून अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. तर अमेय खोपकर यांच्या प्रोडक्शन हाऊसद्वारे या चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. चित्रपटात कोणत्या कलाकारांची वर्णी लागली आहे, याबद्दलची माहिती अद्याप गुलदस्त्यातच आहे.

Intro:Body:

ent 04

Conclusion:
Last Updated : Jun 23, 2019, 7:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.