सण-उत्सव आणि कलाविश्वाचे वर्षानुवर्षापासून घट्ट असे नाते आहे. कोणताही सण-उत्सव असो, कलाविश्वात त्या प्रत्येक सणाचे महत्व जोपासले जाते. मराठी-हिंदी दोन्हीही सिनेसृष्टीत सण-उत्सवांचे प्रतिबिंब पाहायला मिळते. आता होळीचा सण काहीच दिवसांवर आला आहे. या सणाच्या निमित्तानेही अनेक चित्रपटांमध्ये होळीचे रंग दिलखुलासपणे उधळले गेले आहेत. जाणून घेऊयात अशाच काही मराठमोळ्या गाण्यांबद्दल...
'अग नाच नाच राधे उडवूया रंग' -
हे गाणे अशोक सराफ यांच्या गोंधळात गोंधळ या चित्रपटातील आहे. उत्तरा केळकर आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजातील या गाण्याची आजही क्रेझ पाहायला मिळते.
'खेळताना रंग बाई होळीचा'
सुलोचना चव्हाण यांच्या आवाजातील ही लावणी आजही होळी, रंगपंचमीच्या काळात आवर्जुन आठवली जाते.
'आज गोकुळात रंग खेळतो हरी'
सुरेश भट यांचे बोल असलेले हे भावगीत लता मंगेशकर यांनी गायले आहे.
'लय भारी'
रितेश देशमुख आणि राधिका आपटे यांच्या 'लय भारी' या चित्रपटातील हे गाणं प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस उतरले होते. स्वप्नील बांदोडकर आणि योगीता गोडबोले यांनी हे गाणे गायले होते. अजय-अतूल या जोडीने या गाण्याला संगीत दिले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
'सर्फ लावून धुवून टाक'
'लय भारी' चित्रपटानंतर रितेश देशमुख 'माऊली' चित्रपटात झळकला. या चित्रपटातील 'सर्फ लावून धुवून टाक' हे गाणेदेखील होळीच्या रंगावर आधारित होते. या गाण्यात जेनेलियासोबत रितेशची पुन्हा एकदा रोमॅन्टिक केमेस्ट्री पाहायला मिळाली.
'सैराट झालं जी'
अख्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या आर्ची आणि परश्यावर आधारित 'सैराट झालं जी' या गाण्यातही 'आर्ची' आणि 'परश्या'च्या प्रेमाचे रंग पाहायला मिळतात.