ETV Bharat / sitara

नेटफ्लिक्सच्या 'या' वेबसीरिजमध्ये मनीषा कोईरालाची वर्णी

author img

By

Published : Aug 1, 2019, 5:52 PM IST

मनीषा कोईराला संजय दत्तसोबत 'प्रस्थानम' चित्रपटात दिसणार आहे. तर, 'संजू' चित्रपटातूनही ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

नेटफ्लिक्सच्या 'या' वेबसीरिजमध्ये मनीषा कोईरालाची वर्णी

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री मनीषा कोईराला बऱ्याच काळानंतर मोठ्या पडद्यावर भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाली आहे. लवकरच ती संजय दत्तसोबत 'प्रस्थानम' चित्रपटात दिसणार आहे. तर, 'संजू' चित्रपटातूनही ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. बॉलिवूडसोबतच ती नेटफ्लिक्सच्या एका सीरिजमध्येही झळकणार आहे. 'मस्का' असे या आगामी सीरिजचे नाव आहे.

'नेटफ्लिक्स'ने 'मस्का' सीरिजच्या कलाकारांची नावे जाहीर केली आहे. मनीषा कोईरालासोबत सिंगर शर्ली सेतिया, निकिता दत्ता आणि प्रीत कमानी यांचीही वर्णी लागली आहे. नीरज अधवाणी हे या सीरिजचे दिग्दर्शन करत आहेत. सेहर ऐली लतीफ आणि म्यूटेंट फिल्म्सच्या शिवानी सरन हे या सीरिजची निर्मिती करत आहेत.

'मस्का' सीरिजची कथा ही एका सर्वसामान्य मुलीवर आधारित आहे. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती कशाप्रकारे मेहनत घेते. हे या वेबसीरिजमध्ये दाखवण्यात येणार आहे.

'मस्का'तील कलाकारांचा एक व्हिडिओदेखील सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

Intro:Body:

ent

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.