हैदराबाद - बॉलिवूड अभिनेत्री कृती सेनॉन आगामी 'आदिपुरुष' या चित्रपटात प्रभाससोबत सीतेची भूमिका साकारताना दिसणार आहे. ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटात रामायणमधील उत्तम व्यक्तिरेखा साकारण्यासाठी संधी मिळाल्याबद्दल तिने आभार मानले आहेत. यापूर्वी कधीही प्रभासबरोबर एकत्र काम केले नसल्यामुळे प्रभासबद्दल तिच्या काय भावना आहेत याचाही खुलासा कृतीने केला आहे.
'आदिपुरुष'मध्ये सीतेच्या भूमिकेत कृती सेनॉन
"मी खूप आभारी आणि भाग्यवान आहे कारण मला ही आयकॉनिक व्यक्तीरेखा साकारायला मिळत आहे. भूमिका करताना एक प्रकारचे दडपण जाणवत आहे कारण लोकांच्या भावना या गोष्टीशी जोडल्या गेल्या आहेत. " असे कृतीने एका वेबलोइडला सांगितले.
हेही वाचा - कास्टिंग काऊच' करणाऱ्याला अंकिता लोखंडेने दिले सडेतोड उत्तर
राऊत असल्यामुळे चिंता नाही
या प्रक्रियेबद्दल बोलताना कृती म्हणाली की, या चित्रपटासाठी तिला तेलुगू भाषेवर काम करावे लागणार आहे, कारण हा चित्रपट दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होईल. अभिनेत्री कृतीने चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊतवरही कौतुकाचा वर्षाव केला आणि म्हणाली की ती 'सेफ हँड्स'मध्ये असल्याने अभिनयाशिवाय इतर कशाचीही तिला चिंता करण्याची गरज नाही.
प्रभास लाजरा बुजरा आहे पण...
प्रभासचा नैसरगिक स्वभाव लाजरा असल्यामुळे मोकळेपणाने वागण्यासाठी तिने काय केले याबद्दलही कृतीने सांगितले.
''मी जेव्हा त्याला पहिल्यांदा भेटले तेव्हा मला वाटले तो लाजाळू आहे. पण जेव्हा आम्ही बोलायला सुरुवात केली तेव्हा आम्ही थांबतच नव्हतो. तो खवैय्या आहे आणि त्याला सहकलाकारांना खाऊ घालायला आवडते.'', असे कृती म्हणाली.
'रावणा'च्या भूमिकेत सैफ अली खान
प्रभास आणि कृती सेनॉन यांच्यासह 'आदिपुरुष' या चित्रपटात सैफ अली खानची प्रमुख भूमिका आहे. प्रभास यात रामाची भूमिका साकारत असून सैफ अली रावणाची भूमिका वटवणार आहे.
हेही वाचा - कार्तिक आर्यननंतर आता सुपरस्टार आमिर खानला कोरोनाची बाधा