मुंबई - भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रतिभावंत निर्माता, दिग्दर्शक, नट आणि पटकथाकार म्हणजेच व्ही. शांताराम. आपल्या कारकिर्दीत त्यांनी ९२ सिनेमाची निर्मिती केली. तर. ५२ सिनेमांच स्वतः दिग्दर्शन केले. तसंच २५ सिनेमांमध्ये स्वतः अभिनय देखील केला. कायम सर्वसामान्य माणसाला नजरेसमोर ठेवून त्यांना जाणीव करून देणाऱ्या विषयांवर सिनेमे बनवले. त्यांना सिनेक्षेत्राबद्दल काहीही माहित नसताना त्यांनी सिनेसृष्टीत इतिहास घडवला, असे त्यांचे सुपुत्र किरण शांताराम यांनी सांगितले आहे.
त्याचा 'दो आंखे बारह हाथ' हा सिनेमा पाहिल्यावर ख्यातनाम दिग्दर्शक सत्यजित रे यांनी मिस्टर शांताराम इज परफेक्ट डिरेक्टर असं म्हणत त्यांचं कौतुक केलं होतं. याच सिनेमाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान त्याच्या डोळ्याला बैलाशी झुंज देताना जखम झाली. त्यानंतर त्यांनी मुलगा किरण याना आपल्याला मदत करण्यासाठी राजकमल स्टुडिओत कार्यरत होण्याची गळ घातली. पुढील 56 वर्ष आपण त्यांना असिस्ट केलं. आजही ते याच राजकमल स्टुडिओत आहेत, अशी आमची भावना आहे, असंही ते म्हणाले.
हेही वाचा -प्रतिभावंत कलाकार 'व्ही. शांताराम', ज्येष्ठ समीक्षक दिलीप ठाकूरांनी सांगितल्या आठवणी