ETV Bharat / sitara

केट विन्स्लेटचा टोरंटो फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'ट्रिब्यूट अ‍ॅक्टर' पुरस्काराने होणार सन्मान

टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यावर्षी ऑस्करविजेती अभिनेत्री केट विन्स्लेट हिला ट्रिब्यूट अ‍ॅक्टर पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. आभासी उत्सव सोहळ्या दरम्यान तिला 15 सप्टेंबरला हा सन्मान मिळेल.

Kate Winslet
केट विन्स्लेट
author img

By

Published : Jul 17, 2020, 7:44 PM IST

वॉशिंग्टन: अभिनेत्री केट विन्स्लेटच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा लावला जाणार आहे. विन्स्लेटला 15 सप्टेंबर रोजी 2020 टोरंटो फिल्म फेस्टिव्हलमध्ये ट्रिब्यूट अ‍ॅक्टर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ऑस्कर जिंकणार्‍या या अभिनेत्रीला हा सन्मान तिच्या अलिकडे गाजलेल्या ''फ्रान्सिस लीज अम्मोनाईट''नंतर आभासी उत्सवा दरम्यान मिळणार आहे.

''फ्रान्सिस लीज अम्मोनाईट''मध्ये तिने मेरी अॅनी ही व्यक्तीरेखा सायर्स रॉननसह साकारली होती.

टोरंटो फेस्टिव्हलचे कार्यकारी संचालक आणि सहप्रमुख जोआना व्हाइसेंटे यांनी दिलेल्या वृत्तानुसार, “केटची आकर्षक ऑनस्क्रीन उपस्थिती प्रेक्षकांना आणि कलाकारांना मोहित करणारी, मनोरंजक आणि प्रेरणा देणारी आहे.”

हेही वाचा - तैवानच्या 'डिटेन्शन'ने ताइपे फिल्म फेस्टिव्हलमध्ये जिंकले सर्वाधिक पुरस्कार

मागील वर्षी, टोरंटो फिल्म फेस्टिव्हलमध्ये ट्रिब्यूट अ‍ॅक्टर पुरस्काराने मेरिल स्ट्रिप, तायका वैतीती, मती दीप आणि जोकॉइन फिनिक्सचा सन्मान करण्यात आला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.