ETV Bharat / sitara

'उजडा चमन'च्या स्पेशल स्क्रिनिंगमध्ये सनीच्या सोनू आणि स्विटीनेही लावली हजेरी - उजडा चमन स्पेशल स्क्रिनिंग

सनीने 'सोनू के टिटू की स्विटी' या चित्रपटात भूमिका साकारली होती. यामध्ये कार्तिक आर्यन आणि नुसरत भरुचा यांचीही मुख्य भूमिका होती.

'उजडा चमन'च्या स्पेशल स्क्रिनिंगमध्ये सनीच्या सोनू आणि स्विटीनेही लावली हजेरी
author img

By

Published : Nov 1, 2019, 8:47 PM IST

मुंबई - अभिनेता सनी सिंगची मुख्य भूमिका असलेला 'उजडा चमन' हा चित्रपट १ नोव्हेंबरला प्रदर्शित झाला आहे. अलिकडेच मुंबईत या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बॉलिवूड कलाकारांनी आपली हजेरी लावली होती.

सनीने 'सोनू के टिटू की स्विटी' या चित्रपटात भूमिका साकारली होती. यामध्ये कार्तिक आर्यन आणि नुसरत भरुचा यांचीही मुख्य भूमिका होती. या चित्रपटात सनीने 'टिटू' म्हणजे कार्तिक आर्यनच्या मित्राची भूमिका साकारली होती. त्यामुळे सनीच्या 'उजडा चमन' या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंग दरम्यान कार्तिक आणि नुसरतने विशेष हजेरी लावली होती.

हेही वाचा -प्रियंकाने फ्रोझन २ मधील एल्सा आणि अन्नाची करुन दिली ओळख, व्हिडिओ व्हायरल

बॉलिवूडच्या बऱ्याच कलाकारांनी यावेळी हजेरी लावली होती. आपल्या ग्लमरस अंदाजाने सर्वांनी यावेळी लक्ष वेधले. सर्वांनी 'उजडा चमन' चित्रपटाचं कौतुकही केलं. यावेळी सनी सिंगने आपल्या कुटुंबियांसोबत हजेरी लावली होती.

'उजडा चमन'ची स्पेशल स्क्रिनिंग

कार्तिक आर्यनसोबत नुसरत भरुचाची उपस्थिती यावेळी विशेष ठरली.

हेही वाचा -'शाहिस्तेखान व्यक्ती म्हणून कसा असेल तेच साकारण्याचा प्रयत्न केला'

अभिनेता अजय देवगननेही आपली उपस्थिती दर्शवली. यासोबतच पुलकीत सम्राट, वत्सल सेठ, निकिता दत्ता, सोनाली सेगल, कुणाल खेमु, मंदना करीमी, हिमांश कोहली, उत्कर्ष शर्मा, सुरज पांचोली, रोहन मेहरा आणि पत्रलेखा यांसारखे कलाकार यावेळी उपस्थित होते.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.