मुंबई - शाहरुख खानची मुलगी सुहाना लवकरच बिग बॉसचा लोकप्रिय स्पर्धक असिम रियाझसोबत स्क्रिन शेअर करणार असल्याची बातमी आहे. सोशल मीडियामुळे नेहमी चर्चेत असलेली सुहाना आपल्या सिनेमात झळकण्याच्या स्वप्नांच्या जवळ पोहोचली आहे.
मिळालेल्या रिपोर्टनुसार, करण जोहर नेहमी स्टार किड्सना लाॅंच करण्यासाठी ओळकला जातो. त्याने सुहाना कानला लाॅंच करण्याचा विडा उचलला आहे. मिळालेल्या रिपोर्टनुसार असिम आणि सुहाना आगामी 'स्टू़डेंट ऑफ द ईयर 3' या चित्रपटातून लॉन्च होतील.
करण जोहरने या 'स्टू़डेंट ऑफ द ईयर' फ्रॅन्चाइजमधून आतापर्यांत आलिया भट्ट, वरुण धवन, सिध्दार्थ मल्होत्रा, अनन्या पांडे आणि तारा सुतारिया यांना प्रकाशझोतात आणलंय.
सुहानाला करण जोहर लाॅंच करणार असल्याच्या बातमीला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.