चेन्नई - ज्येष्ठ अभिनेते आणि निर्माते कमल हसन शनिवारी आपला 66 वा वाढदिवस साजरा करीत आहेत. या खास प्रसंगी त्यांच्या मुलींनी आपल्या 'बापूजी'ला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
वडिलांसोबत बालपणाचा फोटो शेअर करताना श्रुतीने इन्स्टाग्रामवर लिहिलंय, "माझ्या बापूजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अप्पा, आतापर्यंतच्या अनेक वर्षांप्रमाणेच हे वर्ष तुम्हाला चांगले जाओ. जगासाठी तुम्ही जो काही संग्रह केलाय, ते पाहण्याची जास्त प्रतीक्षा मी नाही करु शकत."
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा - अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार अजय देवगण
अक्षरानेही वडिलांसोहबतचा एक फोटो पोस्ट करीत लिहिलंय, ''केवळ माझ्यासाठीच नाही तर लाखो लोकांसाठी एक उदाहरण घालून देणारे माझे मित्र, माझे चांगले वडिल आणि एक दिग्गज यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा. माझ्या बापूजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा.''