ETV Bharat / sitara

'शौर्याचा खरा अर्थ तुमच्याकडून समजला', 'कारगिल गर्ल'च्या वाढदिवशी जान्हवीच्या शुभेच्छा - पंकज त्रिपाठी

'गुंजन सक्सेना - द कारगिल गर्ल' हा चित्रपट दिग्दर्शक शरन शर्मा हे करत आहेत. तर, या चित्रपटाची निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनअंतर्गत करण्यात येणार आहे.

'शौर्याचा खरा अर्थ तुमच्याकडून समजला', 'कारगिल गर्ल'च्या वाढदिवशी जान्हवीच्या शुभेच्छा
author img

By

Published : Aug 31, 2019, 3:16 PM IST

मुंबई - कारगिल युद्धात आपल्या शौर्याने सर्वांना भारावुन टाकणाऱ्या लढवय्या गुंजन सक्सेना यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या पराक्रमाची कथा उलगडणारा 'कारगिल गर्ल' हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री जान्हवी कपूर ही भारतीय वायु दलातील वैमानिकाच्या भूमिकेत झळकणार आहे. गुंजन सक्सेना यांची भूमिका ती साकारणार आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक देखील प्रदर्शित झाला आहे. आज गुंजन यांच्या वाढदिवसानिमित्त जान्हवीने इन्स्टाग्रामवर त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

जान्हवीने गुंजन यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोसोबतच तिने एक खास संदेशही लिहला आहे. 'तुमच्याकडुन मला शौर्याचा खरा अर्थ समजला. कठोर परिश्रमाचं महत्व देखील मला समजलं. तुम्ही सर्वांसाठी प्रेरणा आहे. तुमच्या कथेने माझा आत्मविश्वास वाढवला आहे. माझ्याप्रमाणे इतरांनाही तुमची कथा प्रेरणादायी ठरेल', असे जान्हवीने या पोस्टसोबत लिहले आहे.

'गुंजन सक्सेना - द कारगिल गर्ल' हा चित्रपट दिग्दर्शक शरन शर्मा हे करत आहेत. तर, या चित्रपटाची निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनअंतर्गत करण्यात येणार आहे.

हेही वाचा- अमृता प्रीतम यांच्या आठवणींना उर्मिला मातोंडकरने दिला उजाळा, वाचा ट्विट

या चित्रपटाचे तीन पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले आहे. तसेच, जान्हवीचा फर्स्ट लूक देखील पाहायला मिळाला आहे. या चित्रपटात पंकज त्रिपाठी आणि अंगद बेदी यांच्यादेखील भूमिका पाहायला मिळणार आहेत. पुढच्या वर्षी मार्च महिन्यात १३ तारखेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

हेही वाचा-वादाच्या भोवऱ्यात 'साहो' : निर्मात्यावर लिसा रेने केला 'चोरी'चा आरोप

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.