मुंबई - सध्या बरेच बॉलिवूड कलाकार डिजीटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत आहेत. आता अभिनेत्री हुमा कुरेशी हिनेही डिजीटल विश्वात ऐन्ट्री घेतली आहे. तिच्या पहिल्या वहिल्या वेबसीरिजचे पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. 'लैला' असे तिच्या पहिल्या वेबसिरीजचे नाव आहे.
चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी या सीरिजचा पहिला लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. दीपा मेहता या वेबसीरिजचे दिग्दर्शन करत आहे. १४ जून २०१९ पासून ही वेबसीरिज प्रेक्षकांना नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे.