मुंबई - मालिका, चित्रपट आणि वेबसीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांवर भूरळ पाडणारा अभिनेता विक्रांत मेस्सीचा आज वाढदिवस आहे. विक्रांतने २००४ मध्ये कहा हूँ में या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. यानंतर त्याने धरम वीर, बालिका वधू, कबुल हैंसारख्या अनेक मालिकांमध्ये भूमिका साकारल्या.
लुटेरा, दिल धडकने दो आणि हाफ गर्लफ्रेंडसारख्या चित्रपटंमध्ये त्याने लहान रोल साकारले. तर, द डेथ इन द गुंज सिनेमातील त्याची भूमिका चांगलीच गाजली. यासाठी त्याला अॅवॉर्डदेखील मिळाला. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या छपाक सिनेमात त्याने महत्त्वाची भूमिका साकारली.
विक्रांतने मालिका आणि सिनेमांशिवाय वेबसीरिजमध्येदेखील काम केले आहे. मिर्जापूर सीरिजमध्ये त्याने साकारलेला बबलू भैयाचा रोल प्रेक्षकांची मने जिंकणारा होता. याशिवाय त्याने क्रिमीनल जस्टीस या थ्रिलर वेबसीरिजमध्येही मुख्य भूमिका निभावली आहे.