ETV Bharat / sitara

नाटक जगणारा अवलिया काळाच्या पडद्याआड; गिरीश कर्नाड यांनी बंगळुरात घेतला अखेरचा श्वास

गिरीश यांना १९९९ साली साहित्यातील सर्वोत्कृष्ठ ज्ञानपीठ पुरस्कारानेही सन्मानीत करण्यात आले. तसेच त्यांना पद्मश्री (१९७४) आणि पद्मभूषण (१९९२) पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

ज्येष्ठ अभिनेते गिरीश कर्नाड यांचे निधन
author img

By

Published : Jun 10, 2019, 9:43 AM IST

Updated : Jun 10, 2019, 12:09 PM IST

मुंबई - प्रसिद्ध नाटककार, ज्येष्ठ अभिनेते, लेखक गिरीश कर्नाड यांचे सोमवारी (१० जून) सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे. बंगळुरु येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८१ वर्षांचे होते.

गिरीश यांचा जन्म १९ मे १९३८ साली माथेरान येथे झाला होता. त्यांचे शिक्षण पुणे येथे झाले आहे. पुढे त्यांनी नाट्यक्षेत्रात स्वत:ला झोकून दिले. त्यांच्या नाटकांनी भारतासह विदेशातही बरेच नाव कमावले आहे.

गिरीश यांनी लिहिलेले 'युवती' (१९६१) हे पहिले नाटक होते. त्यांनतर त्यांचे 'तुघलक' (१९६४) हे नाटक देखील गाजले होते. त्यांनी बऱ्याच नाटकांचे लिखाणही केले आहे. त्यांनी १९७० मध्ये कन्नड चित्रपट 'संस्कार' मधून चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले होते. चित्रपट दिग्दर्शक म्हणून त्यांनी 'वंशवृक्ष' चित्रपटाद्वारे सुरुवात केली. या चित्रपटाला बरेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले.

गिरीश कर्नाड यांनी बंगळुरात घेतला अखेरचा श्वास

बॉलिवूडच्याही बऱ्याच चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारली आहे. सलमान खानच्या 'एक था टायगर', 'टायगर जिंदा है', सुशांत सिंगच्या 'एम.एस.धोनी' या चित्रपटातील त्यांच्या भूमिका स्मरणीय ठरल्या.

गिरीश यांना १९९९ साली साहित्यातील सर्वोत्कृष्ठ ज्ञानपीठ पुरस्कारानेही सन्मानीत करण्यात आले. तसेच त्यांना पद्मश्री (१९७४) आणि पद्मभूषण (१९९२) पुरस्काराने गौरविण्यात आले होते. गिरीश यांचे 'अडाडता आयुष्य' (खेळता खेळता आयुष्य) हे आत्मचरित्र देखील आहे.

त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपट आणि रंगभूमीच्या एका महान युगाचा शेवट झाला आहे. त्यांची सिनेसृष्टीतील पोकळी कधीही न भरुन निघण्यासारखी आहे. कलाक्षेत्रात त्यांच्या जाण्याने शोक व्यक्त केला जात आहे.

Intro:Body:

Girish

Conclusion:
Last Updated : Jun 10, 2019, 12:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.