ETV Bharat / sitara

'पद्मश्री' पुरस्कार जाहीर झाल्यानंतर एकता कपूर जितेंद्र यांच्यासह साईचरणी

पद्मश्री पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर एकता कपूर साईचरणी लीन होण्यासाठी शिर्डीत दाखल झाली. यावेळी तिच्यासोबत दिग्गज अभिनेता आणि तिचे वडील जितेंद्रही हजर होते.

author img

By

Published : Jan 29, 2020, 2:39 PM IST

Updated : Jan 29, 2020, 11:41 PM IST

Ekata Kapoor and Jitendra
एकता कपूर जितेंद्र यांच्यासह साई चरणी लीन

अहमदनगर - प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्मश्री पुरस्कारांची घोषणा झाली. यात निर्माती एकता कपूरला हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला. हा आपल्यासाठी मोठा धक्का होता, असे एकताने म्हटलंय. आज तिने वडील जितेंद्र यांच्यासह शिर्डीत येऊन साई समाधीचे दर्शन घेतले.

एकता कपूर जितेंद्र यांच्यासह साई चरणी लीन

यावेळी माध्यमांशी एकता बोलत होती. पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याचा फोन मंत्रालयातून आला तेव्हा धक्का बसल्याचे तिने सांगितले. इतका मोठा पुरस्कार मिळेल अशी अपेक्षा ठेवली नव्हती, असे ती म्हणाली. यापुढेही नव्या टॅलेंटसाठी काम करणार असल्याचे तिने सांगितले.

अभिनेता जितेंद्र यांनी साईबाबांचा आशीर्वाद आपल्यावर असल्याचे सांगितले. मुलीला मिळालेल्या पद्मश्री पुरस्काराबद्दल भारत सरकार आणि साईबाबांचे त्यांनी आभार मानले. १९७३ पासून आपण शिर्डीला येत असल्याचे सांगत बाबांचा आशीर्वाद कायम राहवा अशी इच्छा बोलून दाखवली.

एकता शिर्डीत पोहोचल्यानंतर मंदिर परिसरातील दुकानातून तिने साईंची प्रतिमा असलेली अंगठी जितेंद्र यांच्यासाठी खरेदी केली. ही अंगठी तिने साईचरणावर ठेवत जितेंद्र यांना दिली. यामुळे जितेंद्र भारावले.

साईंचे दर्शन घेतल्यानंतर साईबाबा संस्थानाच्या वतीने त्यांना साईंची मूर्ती आणि प्रतिमा देऊन एकता आणि जितेंद्र यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी साई संस्थानाचे पदाधिकारी उपस्थित होते. यानंतर एकता आणि जितेंद्र नाशिकच्या दिशेने रवाना झाले.

Intro:

ANCHOR_ आज सरकारने माझी पद्मश्री पुरस्कारा साठी निवड केली आहे सरकारचे आणि साईबाबांचे आभार माणन्यासाठी मी शिर्डीला आले असल्याच एकता कपुरने साईबाबांच्या दर्शना नंतर बोलताना सांगीतलय....

VO_प्रसिध्द अभिनेते जितेंद्र आणि त्यांची मुलगी एकता कपुर यांनी आज शिर्डीत येवुन साई समाधीच दर्शन घेतलय.एकता कपुर आज मंदीर परीसरात आल्या नंतर बाजारातुन जावुन काही वस्तु घेतल्या त्यात प्रामुख्याने साईबाबांची प्रतिमा असलेली चांदीची आंगठी खरेदी केली त्या नंतर साईमंदीरात दर्शनावेळी साई समाधीला ती अंगठी लावत जितेंद्रला घालवयास दिली त्या नंतर माध्यमांशी बोलतांना एकता कपुरने तीची पद्मश्री पुरस्कारा साठी निवड केल्या बद्दल सरकारचे आभार मानलेत याच बरोबरीने आज पर्यत तीच्या आणि वडीलांच्या यशात साईंचा मोठा वाटा असल्याने साईचे आभार मानण्यासाठी शिर्डीला आल्याच म्हटल झी च्या ऑफीस मध्ये मी पायलट सोडुन आले होते त्यांना मला हमपांच करण्याची संघी दिली म्हणुन मी आज इथ पोहचु शकले आहे भारत देश आता प्रगती करतोय आणि त्यात माझा वाटा म्हणुन मी आगामी काही वर्षात तरुण टँलेंटला चान्स देणार असल्याच एकता ने म्हटलय....

BITE_ एकता कपुर डायरेक्टर

VO_जितेंद्र हे साईभक्त आहेत ते 1973 पासुन शिर्डीला येतात मला जन्म माझ्या आई वडीलांनी दिला मात्र मला जितेंद्र म्हणुन पुढ आणल ते शांताराम यांनी त्यांचा मी सदैव रुणी आहे तसच सबका मालीक एकचा संदेश देणार्या साईंचाही रुणी आहे ,एक वडील म्हणुन एकताला मिळालेल्या पद्मश्रीचा मला आनंदच आहे....

BITE_जितेंद्र कपुर सिनेअभिनेता

VO_ गेल्या महीण्यात जितेंद्रने शिर्डीला येवुन साई समाधीच दर्शन घेतल होते आता मुलीला पद्मश्री पुरस्कार मिळाल्याने त्यांनी मुली समवेत येवुन साईंचे आभार मानत दर्शन घेतलय..एकताने आपल्या वडील जितेंद्र यांच्या बरोबर साई मंदीरा परीसरातील गुरुस्थान मंदीरा सह अनेक ठिकाणी सेल्फीही घेतले आहे...या नंतर पत्रकारांशी बोलतांना एकता वडीलांच्या गळ्यात हात घालुनच बोलत होती..साई दर्शना नंतर एकता आणि जितेंद्र नाशिक त्रयंबकेश्वर कड़े रवाना झाले आहे....Body:mh_ahm_shirdi_jitendr ekata kapoor_29_visuals_bite_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_jitendr ekata kapoor_29_visuals_bite_mh10010
Last Updated : Jan 29, 2020, 11:41 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.