मुंबई - बॉलिवूड अभिनेता व चित्रपट निर्माता रणधीर कपूर कोरोनाच्या आजारातून बरे झाले आहेत. गेल्या महिन्याच्या अखेरीस मुंबईच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल झालेल्या कपूर यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. आता ते घरी परतले आहेत पण अद्याप कुटुंबीयांना भेटलेले नाहीत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
एका अग्रगण्य दैनिकाशी बोलताना, अभिनेता रणधीर यांनी पुष्टी केली की ते कोविड -१९ मुक्त झाले आहे. रणधीर म्हणाले की ते घरी परतले असून त्यांची तब्येत बरी आहे.
करिश्मा आणि करिना कपूर यांचे वडील आणि अभिनेत्री बबिता यांचे पती रणधीर कपूर म्हणाले, "मी घरी परतलो आहे. मला एकदम ठीक वाटत आहे." आपल्या कुटुंबातील कोणालाही काही दिवस न भेटण्याचा सल्ला देण्यात आला असल्याचे त्यांनी पुढे सांगितले. रणधीर म्हणाले, "मला दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मी लोकांना भेटण्यापूर्वी अजून काही काळ जाण्याची गरज आहे."
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
चित्रपट निर्माते राज कपूर यांचा थोरला मुलगा असलेल्या रणधीर कपूर यांनी एका वर्षाच्या आत आपले लहान भाऊ ऋषी कपूर (६७) आणि राजीव कपूर (५८) यांना गमावले होते.
घरी परतल्यावर, रणधीर यांनी रुग्णालयाच्या कर्मचार्यांचे आभार मानले आहेत.
हेही वाचा - जातीवाचक बोलल्याबद्दल अभिनेत्री मुनमुन दत्ता विरोधात मध्य प्रदेशात गुन्हा दाखल