ETV Bharat / sitara

‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटाला काँग्रेस, राष्ट्रवादीसह डीएमकेने केली बंदीची मागणी

‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट निवडणूकीच्या काळात रिलीज होऊ नये अशी मागणी जोर धरु लागलीय...यात भाजपचा छुपा अजेंडा असल्याचा आरोप होतोय...काँग्रेस पाठोपाठ आता राष्ट्रवादी आणि डीएमकेनेही बंदीची मागणी केलीय...

पीएम नरेंद्र मोदी’
author img

By

Published : Mar 22, 2019, 3:34 PM IST

Updated : Mar 22, 2019, 8:45 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट प्रदर्शनाआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. काँग्रेसनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि डीएमके पक्षानं देखील मोदींच्या बायोपिकवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

‘पीएम नरेंद्र मोदी’ हा पंतप्रधानांच्या जीवनावरचा चित्रपट रिलीजपूर्वीच चर्चेत आलाय. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट रिलीज केला जाऊ नये अशी भूमिका काँग्रेस पक्षाने घेतली होती. आता या मागणीला जोर वाढत असून डीएमके पक्षानेही चित्रपटाला विरोध दर्शवला आहे.

आगामी लोकसभा निवडणूक होईपर्यंत या चित्रपटाच्या प्रदर्शनाला बंदी घालावी अशी मागणी डीएमके पक्षाने केली आहे. यासाठी त्यांनी निवडणूक आयोगाला पत्रही लिहिले आहे. यात भाजपाचा निवडणूक प्रचाराचा स्पष्ट हेतू असून अजेंडा लपला असून या चित्रपटातून भाजप आपला पक्षाचा अजेंडा राबवत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

यापूर्वी काँग्रेस पक्षानेही चित्रपट पर्दर्शित होऊ नये अशी भूमिका घेतली आहे. चित्रपट अधिक लोकांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी याचे रिलीज प्रिपोंड करण्यात आले होते. १२ एप्रिलला रिलीज होणारा हा चित्रपट एक आठवडा अगोदर म्हणजेच ५ एप्रिलला रिलीज करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.

मतदारांच्या प्रभाव टाकण्यासाठीच हा चित्रपट बनवल्याचा आरोप काँग्रेस आणि डीएमकेने केला आहे. २३ भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज करण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे देशात सर्वत्र निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांची प्रतिमा संवर्धन करण्यासाठी हा एक प्रचाराचा भाग असल्याचा आरोप केला जातोय.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक ओमंग कुमार यांची ही कलाकृती असून विवेक ओबेरॉयने यात मोदींची भूमिका साकारली आहे.

Intro:Body:

‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट निवडणूकीच्या काळात रिलीज होऊ नये अशी मागणी जोर धरु लागलीय...यात भाजपचा छुपा अजेंडा असल्याचा आरोप होतोय...काँग्रेस पाठोपाठ आता डीएमकेनेही बंदीची मागणी केलीय...

......................

Congres and DMK demanded ban on PM Modi biopic

 ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटाला काँग्रेससह डीएमके केली बंदीची मागणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट प्रदर्शनाआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. काँग्रेसनंतर आता डीएमके पक्षानं देखील मोदींच्या बायोपिकवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

‘पीएम नरेंद्र मोदी’ हा पंतप्रधानांच्या जीवनावरचा चित्रपट रिलीजपूर्वीच चर्चेत आलाय. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हगा चित्रपट रिलीज केला जाऊ नये अशी भूमिका काँग्रेस पक्षाने घेतली होती. आता या मागणीला जोर वाढत असून डीएमके पक्षानेही चित्रपटाला विरोध दर्शवला आहे.

आगामी लोकसभा निवडणूक होईपर्यंत या चित्रपटाच्या प्रदर्शनाला बंदी घालावी अशी मागणी डीएमके पक्षाने केली आहे. यासाठी त्यांनी निवडणूक आयोगाला पत्रही लिहिले आहे. यात भाजपाचा निवडणूक प्रचाराचा स्पष्ट हेतू असून अजेंडा लपला असून या चित्रपटातून भाजप आपला पक्षाचा अजेंडा राबवत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

यापूर्वी काँग्रेस पक्षानेही चित्रपट पर्दर्शित होऊ नये अशी भूमिका घेतली आहे. चित्रपट अधिक लोकांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी याचे रिलीज प्रिपोंड करण्यात आले होते. १२ एप्रिलला रिलीज होणारा हा चित्रपट एक आठवडा अगोदर म्हणजेच ५ एप्रिलला रिलीज करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.

मतदारांच्या प्रभाव टाकण्यासाठीच हा चित्रपट बनवल्याचा आरोप काँग्रेस आणि डीएमकेने केला आहे. २३ भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज करण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे देशात सर्वत्र निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांची प्रतिमा संवर्धन करण्यासाठी हा एक प्रचाराचा भाग असल्याचा आरोप केला जातोय.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक ओमंग कुमार यांची ही कलाकृती असून विवेक ओबेरॉयने यात मोदींची भूमिका साकारली आहे.

Conclusion:
Last Updated : Mar 22, 2019, 8:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.