लॉस एंजेलिस - 'ब्लॅक पँथर'मध्ये अतुलनीय कामगिरी करणारे अमेरिकन अभिनेता चॅडविक बोसमन याचे आतड्याच्या कर्करोगाने निधन झाले. चॅडविक हा गेल्या चार वर्षांपासून कोलोन कॅन्सरशी अर्थात आतड्याच्या कर्करोगाशी लढा देत होता आणि अखेर त्याची ही लढाई अपयशी ठरली. लॉस एंजलिसमधील राहत्या घरी त्याने वयाच्या 43 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
अभिनेत्याच्या कुटुंबीयांनी त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक निवेदन प्रसिद्ध केले आहे, ज्यात असे म्हटले आहे की २०१६ मध्ये त्याला या आजाराचे निदान झाले होते. शेवटच्या क्षणी त्याची पत्नी आणि कुटुंब एकत्र होते.
- — Chadwick Boseman (@chadwickboseman) August 29, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
— Chadwick Boseman (@chadwickboseman) August 29, 2020
">— Chadwick Boseman (@chadwickboseman) August 29, 2020
मार्शल चित्रपटापासून ते डीए ५ ब्लड्सपर्यंत, असे असंख्य चित्रपटाचे शूटिंग त्याने केले होते. या काळात त्याच्यावर शस्त्रक्रिया आणि केमोथेरपी सुरू होती. त्याने ब्लॅक पँथरमध्ये साकारलेली किंग टी चाल्ला ही व्यक्तीरेखा त्याच्या कारकिर्दीमधील सर्वात सन्मानजनक होती.
कुटुंबाने त्यांच्या चाहत्यांचे आणि हितचिंतकांचे आभार मानले आणि कठीण परिस्थितीत कुटुंबाशी असलेला स्नेह कायम ठेवण्याची विनंती केली.