मुंबई - बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा आहे. मागच्या वर्षीच हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली. आता अखेर या चित्रपटाची तारीख ठरली आहे.
चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी 'ब्रह्मास्त्र'च्या टीमचा एक फोटो शेअर केला आहे. सोबतच चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेविषयी माहिती दिली आहे. ४ डिसेंबरला 'ब्रह्मास्त्र'चा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
#Brahmāstra: Part One release date finalized: 4 Dec 2020... Stars #AmitabhBachchan, #RanbirKapoor, #AliaBhatt, #Nagarjuna, #MouniRoy... Directed by Ayan Mukerji... Produced by Dharma Productions and Fox Star Studios... Will release in #Hindi, #Tamil, #Telugu, #Kannada, #Malayalam pic.twitter.com/1h5YP2UJYf
— taran adarsh (@taran_adarsh) February 2, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#Brahmāstra: Part One release date finalized: 4 Dec 2020... Stars #AmitabhBachchan, #RanbirKapoor, #AliaBhatt, #Nagarjuna, #MouniRoy... Directed by Ayan Mukerji... Produced by Dharma Productions and Fox Star Studios... Will release in #Hindi, #Tamil, #Telugu, #Kannada, #Malayalam pic.twitter.com/1h5YP2UJYf
— taran adarsh (@taran_adarsh) February 2, 2020#Brahmāstra: Part One release date finalized: 4 Dec 2020... Stars #AmitabhBachchan, #RanbirKapoor, #AliaBhatt, #Nagarjuna, #MouniRoy... Directed by Ayan Mukerji... Produced by Dharma Productions and Fox Star Studios... Will release in #Hindi, #Tamil, #Telugu, #Kannada, #Malayalam pic.twitter.com/1h5YP2UJYf
— taran adarsh (@taran_adarsh) February 2, 2020
हेही वाचा -शाहरुखची मुलगी सुहानाचे पार्टी फोटो व्हायरल
अयान मुखर्जीने चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर, धर्मा प्रोडक्शन आणि फॉक्स स्टार स्टुडिओज अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. हिंदीसह तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा -दिशाला हवाय 'असा' जीवनसाथी, प्रेमाबद्दल पहिल्यांदाच व्यक्त केली इच्छा