ETV Bharat / sitara

बॉलिवूडचे 'हे' हँडसम हिरो बनले व्हिलन - john abraham

विलनची भूमिका जेवढी दमदार असेल, तितकाच वाव हिरोच्याही भूमिकेला मिळतो. म्हणून आजवर अनेक कलाकार हे विलनच्या भूमिकेत पाहायला मिळाले.

बॉलिवूडचे 'हे' हँडसम हिरो बनले विलन
author img

By

Published : Sep 27, 2019, 10:21 AM IST

मुंबई - बॉलिवूडमध्ये चित्रपट यशस्वी होण्यामागचं कारण 'विलन'ची भूमिका साकारणारा कलाकार असतो. विलनची भूमिका जेवढी दमदार असेल, तितकाच वाव हिरोच्याही भूमिकेला मिळतो. म्हणून आजवर अनेक कलाकार हे विलनच्या भूमिकेत पाहायला मिळाले. यामध्ये ज्यांनी बॉलिवूडमध्ये 'हिरो'ची भूमिका साकारली, अशा अभिनेत्यांनीही कधी कधी विलनची भूमिका निवडली आणि तितक्याच ताकदीने हे 'हिरो' विलनच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आले.

शाहरुख खान - 'डर', बाजीगर
बॉलिवूडचा बादशाह असणाऱ्या शाहरुखने अगदी सुरुवातीच्या काळातच विलनची भूमिका निवडली होती. 'डर' चित्रपटात त्याने दमदार विलन साकारला होता. त्याची भूमिकेचं त्याकाळी प्रचंड कौतुक झालं. १९९३ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. सनी देओल आणि जुही चावला यांची जोडी या चित्रपटात झळकली होती. मात्र, चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर शाहरुखच्याच अभिनयाची जास्त प्रशंसा झाली होती.

Bollywood Hero who play role of villain
शाहरुख खान
त्यानंतर त्याने 'बाजीगर' या चित्रपटातही विलनची भूमिका साकारली होती. या चित्रपटातूनच काजोल आणि त्याची जोडी लोकप्रिय झाली होती.

जिमी शेरगील - 'साहेब बिबी और गँगस्टर', 'तनु वेड्स मनु'
'मोहब्बते' चित्रपटात रोमॅन्टिक भूमिका साकारणारा जिमी शेरगील पुढे 'साहेब बिबी और गँगस्टर' या चित्रपटात विलनच्या भूमिकेत दिसला. त्यानंतर, 'तनु वेड्स मनु' आणि 'तनु वेड्स मनु रिटर्न्स' या चित्रपटात त्याने विलनची भूमिका साकारली होती.

Bollywood Hero who play role of villain
जिमी शेरगील

जॉन अब्राहम - 'धुम'
जॉनने देखील 'धुम' चित्रपटात विलनची भूमिका साकारली होती. या चित्रपटात तो चोराच्या भूमिकेत पाहायला मिळाला होता.

Bollywood Hero who play role of villain
जॉन अब्राहम

हृतिक रोशन - 'धुम २'
हृतिक देखील बॉलिवूडचा हँडसम हिरो म्हणून ओळखला जातो. त्यानेही 'धुम २'मध्ये चोराची भूमिका साकारली होती. हा चित्रपटही सुपरडुपरहिट झाला होता.

Bollywood Hero who play role of villain
हृतिक रोशन

आमिर खान - 'धुम ३'
मिस्टर परफेक्शनीस्ट आमिर खान यानेही धुमच्या तिसऱ्या भागात विलनची भूमिका साकारली होती. यामध्ये तो दुहेरी भूमिकेत दिसला होता.

Bollywood Hero who play role of villain
आमिर खान

नील नितीन मुकेश - 'साहो'
अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'साहो' चित्रपटात नील नितिन मुकेशने विलन साकारला होता. यामध्ये प्रभास आणि श्रद्धा कपूर दोघांची जोडी पाहायला मिळाली. या चित्रपटाशिवाय त्याने बऱ्याच चित्रपटात विलनची भूमिका साकारली आहे.

Bollywood Hero who play role of villain
नील नितीन मुकेश

रितेश देशमुख - 'एक विलन', 'मरजावां'
मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख हा देखील 'एक विलन' या चित्रपटात विलनच्या भूमिकेत दिसला. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा आणि श्रद्धा कपूर यांची जोडी झळकली होती. आता पुन्हा एकदा तो विलनच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिद्धार्थ मल्होत्रा सोबतच 'मरजावां' चित्रपटात तो कमी उंचीच्या व्यक्तीची भूमिका साकारत आहे.

Bollywood Hero who play role of villain
रितेश देशमुख

अक्षय कुमार - '२.०'
बॉलिवूडची हिट मशीन म्हणून ओळखला जाणारा अक्षय कुमार हा देखील रजनिकांत यांच्यासोबत २.० या चित्रपटात झळकला. या चित्रपटात तो विलनच्या भूमिकेत पाहायला मिळाला. त्याचा लूकही चर्चेचा विषय बनला होता.

Bollywood Hero who play role of villain
अक्षय कुमार

संजय दत्त - 'अग्निपथ'
संजय दत्तने हृतिकच्या अग्निपथ चित्रपटात विलनची भूमिका साकारली होती. त्याची ही भूमिका प्रचंड गाजली.

Bollywood Hero who play role of villain
संजय दत्त

विवेक ओबेरॉय - 'क्रिश ३'
अभिनेता विवेक ओबेरॉय याने देखील हृतिक रोशनच्याच 'क्रिश ३'मध्ये विलनची भूमिका साकारली होती.

Bollywood Hero who play role of villain
विवेक ओबेरॉय

Intro:Body:

news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.