मुंबई - फॅशन जगतातील सुप्रसिद्ध असलेला 'लॅक्मे फॅशन विक' मागील ३ दिवसांपासून सुरू आहे. या विकमध्ये बॉलिवूडच्या बऱ्याच कलाकारांचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला. या कलाकारांनी आपल्या स्टाईल स्टेटमेंटने रॅम्पवर आपला जलवा दाखवला. चौथ्या दिवशी अनन्या पांडे, दिशा पटाणी आणि आयुष्मान खुरानानेही रॅम्पवॉक करत उपस्थितांचे लक्ष वेधले.
'स्टूडंट ऑफ द ईयर-२' चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण करणारी अनन्या पांडे हिचे वेगवेगळे लूक रॅम्पवर पाहायला मिळाले. या चित्रपटानंतर तिच्या फॅन फोलोविंगमध्येही वाढ झाली आहे. या फॅशन विकमध्ये ती डिझायनर अनुश्री रेड्डीसाठी शो स्टॉपर बनली होती. लवकरच ती कार्तिक आर्यनसोबत 'पती पत्नी और वो' चित्रपटात झळकणार आहे.
अभिनेत्री दिशा पटाणी हिचा देखील खास अंदाज पाहायला मिळाला. डिझायनर राहुल खन्नाने डिझाईन केलेला ड्रेस तिने यावेळी घातला होता.
आयुष्मानला त्याच्या 'अंधाधून' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. आता तो 'ड्रीमगर्ल' चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.