ETV Bharat / sitara

‘हरिओम’ चित्रपटाच्या टीमतर्फे महारक्तदान शिबिराचे आयोजन!

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे उपचाराधीन पेशंट्सना इंजेक्शन्स, ऑक्सिजन, रक्ताची अतिरिक्त गरज भासू लागली आहे. अशावेळी बऱ्याच समाजसंस्थांनी पुढे येत या गोष्टींचा पुरवठा केला. परंतु रक्ताची गरज वाढतच आहे कारण ब्लड-बॅंक्स मधील पुरवढा संपत चालला आहे. या गोष्टीची दखल घेऊन ‘हरिओम’ चित्रपटाच्या टीमतर्फे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

महारक्तदान शिबिराचे आयोजन
author img

By

Published : Jun 8, 2021, 10:45 PM IST

गेली दीडेक वर्ष संपूर्ण जग आजारी आहे. आपल्या देशातही कोरोना उद्रेकामुळे वैद्यकीय संसाधनांवर अतिरिक्त ताण पडलाय. वाढत्या रुग्णसंख्येमुळे उपचाराधीन पेशंट्सना इंजेक्शन्स, ऑक्सिजन, रक्ताची अतिरिक्त गरज भासू लागली आहे. अशावेळी बऱ्याच समाजसंस्थांनी पुढे येत या गोष्टींचा पुरवठा केला. परंतु रक्ताची गरज वाढतच आहे कारण ब्लड-बॅंक्स मधील पुरवढा संपत चालला आहे. या गोष्टीची दखल घेऊन ‘हरिओम’ चित्रपटाच्या टीमतर्फे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

Blood Donation Camp
‘हरिओम’ चित्रपटाच्या टीमतर्फे महारक्तदान शिबिराचे आयोजन!

कांदिवली पश्चिम येथील श्री विठ्ठल मंदिर छत्रपती शिवाजी राजे कॉम्प्लेक्स, म्हाडा येथे या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाचे सर्व नियम पाळून रक्तदान शिबिरास तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हरिओम चित्रपटाचे दिग्दर्शक आशिष नेवाळकर, अभिनेता गौरव कदम यांनी रक्तदान शिबिरास हजेरी लावली होती.

सिंह नरवीर तानाजी प्रतिष्ठान व ‘हरिओम’ चित्रपटाच्या टीमतर्फे कांदिवली पश्चिम येथील प्रभाग क्रमांक ३२ येथे नुकतेच महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी चित्रपटातील कलाकारांनी सर्वांना रक्तदानाचे महत्त्व पटवून देत रक्तदान करण्याचे आवाहन केले. नगरसेविका गीता भंडारी यांच्या हस्ते शिवरायांच्या मुर्तीस पुष्पहार घालून रक्तदान कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. या वेळी सिंह नरवीर तानाजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष, हरिओम चित्रपटाचे निर्माते, अभिनेते हरीओम घाडगे यांनी विठ्ठल चरणी श्रीफळ वाहून प्रथम रक्तदान केले.

Blood Donation Camp
‘हरिओम’ चित्रपटाचे पोस्टर

नगरसेविका गीता भंडारी यांनी हरीओम घाडगे यांच्या कामाचे कौतुक करून हरिओम हे फक्त चित्रपटातच नाही तर खऱ्या आयुष्यातही हिरोचे काम करत असल्याचे सांगितले. तर शिवसेना शाखाप्रमुख संदीप कोळी यांनी रक्तदान शिबिराच्या नियोजनाबाबत हरिओम घाडगे यांचे कौतुक करत त्यांच्या ‘हरिओम’ या आगामी चित्रपटास शुभेच्छा दिल्या.

'हरिओम' या चित्रपटाचे निर्माते हरिओम घाडगे आणि दिग्दर्शक आशिष नेवाळकर असून हा सिनेमा श्रीहरी स्टुडिओची प्रस्तुती असणार आहे. अद्याप सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा केली नसली तरी हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा - शीरॉक्स' उपक्रमासाठी जॅकलिन फर्नांडीजला 'टाइम्स 40 अंडर 40'च्या यादीमध्ये स्थान!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.