ETV Bharat / sitara

मुलीच्या आवाजात सर्वांना वेड लावतोय आयुष्मान, 'ड्रीमगर्ल'चं दुसरं गाणं प्रदर्शित - एकता कपूर

चित्रपटाच्या दुसऱ्या गाण्यात आयुष्मान पूजाच्या आवाजात सर्वांशी बोलताना पाहायला मिळतो. 'तेरे लिये दिल का टेलिफोन है बजता रिंग रिंग' असे या गाण्याचे बोल आहेत.

मुलीच्या आवाजात सर्वांना वेड लावतोय आयुष्मान, 'ड्रीमगर्ल'चं दुसरं गाणं प्रदर्शित
author img

By

Published : Aug 20, 2019, 2:13 PM IST

मुंबई - आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात आपले भक्कम स्थान निर्माण करणारा अभिनेता आयुष्मान खुराना पुन्हा पडद्यावर परतण्यासाठी सज्ज झाला आहे. 'आर्टिकल १५' सारखा गंभीर विषय हाताळल्यानंतर आता प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करण्यासाठी आगामी 'ड्रीमगर्ल' चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाच्या ट्रेलरने यापूर्वीच चाहत्यांची मने जिंकली आहेत. तसंच 'राधे राधे' गाण्यालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता या चित्रपटातील दुसरं गाणं प्रदर्शित झालं आहे.

आयुष्मान खुराना 'ड्रीमगर्ल' चित्रपटात अनोखी भूमिका साकारत आहे. या चित्रपटातील त्याचे काही डायलॉग्ज हे मुलीच्या आवाजातील आहेत. विशेष म्हणजे हा मुलीचा आवाजही त्याचाच आहे. त्यामुळे चित्रपटात तो 'पूजा' नावाच्या मुलीच्या रुपात सर्वांना वेड लावताना दिसणार आहे.

चित्रपटाच्या दुसऱ्या गाण्यात आयुष्मान पूजाच्या आवाजात सर्वांशी बोलताना पाहायला मिळतो. 'तेरे लिये दिल का टेलिफोन है बजता रिंग रिंग' असे या गाण्याचे बोल आहेत. त्याचे मुलीच्या रुपातील हावभावदेखील चाहत्यांना वेड लावत आहेत. नुकतंच हे गाणं प्रदर्शित झालं असलं तरीही या गाण्याला आत्तापर्यंत ५० हजारपेक्षा जास्त व्हिव्ज मिळाले आहेत.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

या गाण्याला मित ब्रोस आणि जोनीता गांधी यांचा आवाज मिळाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज शांडल्य यांनी केलं आहे. तर, एकता कपूर आणि शोभा कपूर यांनी निर्मिती केली आहे. १३ सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात आयुष्मान सोबत अभिनेत्री नुसरत भरुचा देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.