ETV Bharat / sitara

अनुपम खेर यांनी दिला दिलीप कुमार यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा, शेअर केला 'हा' फोटो - jacky shroff

१९८६ साली 'कर्मा' चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटात अनुपम खेर यांनी व्हिलनची भूमिका साकारली होती. तर, दिलीप कुमार यांनी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती.

अनुपम खेर यांनी दिला दिलीप कुमार यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा, शेअर केला 'हा' फोटो
author img

By

Published : Jun 20, 2019, 9:32 AM IST

Updated : Jun 20, 2019, 10:16 AM IST

मुंबई - बॉलिवुडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर अनेक वर्षे चाहत्यांवर राज्य केले. सिनेसृष्टीत त्यांचे अनमोल असे योगदान आहे. अनुपम खेर यांनी त्यांच्यासोबत 'कर्मा' चित्रपटात भूमिका साकारली होती. या चित्रपटादरम्यान दिलीप कुमार यांच्यासोबतचा अनुभव त्यांनी एका पोस्टद्वारे शेअर केला आहे.

१९८६ साली 'कर्मा' चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटात अनुपम खेर यांनी व्हिलनची भूमिका साकारली होती. तर, दिलीप कुमार यांनी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. त्यांच्यासोबत एक फोटो शेअर करताना अनुपम यांनी लिहिलेय, की 'सुभाष घईचे दिग्दर्शनाखाली माझी ही पहिलीच भूमिका होती. त्यातही मला दिलीप कुमार यांच्यासोबत स्क्रिन शेअर करायची होती. त्यामुळे मी नर्व्हस होतो. मात्र, दिलीप कुमार यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवुन मला आधार दिला. शूट संपल्यानंतर त्यांनी मला शाबासकीची थाप दिली तेव्हा मला वाटलं, की मी खरंच चांगलं काम केलं. त्यांच्यासारखा अभिनेता होणे शक्य नाही', असे अनुपम खेर यांनी लिहिले आहे.

Anupam Kher Remembers meeting Dilip Kumar on Karma Set
अनुपम खेर यांनी शेअर केलेली पोस्ट

'कर्मा' चित्रपटात नुतन, नसिरुद्दीन शाह, जॅकी श्रॉफ, अनिल कपूर, पुनम धिल्लोन, श्रीदेवी आणि दारा सिंग हे कलाकारही झळकले होते. ८ ऑगस्ट १९८६ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Jun 20, 2019, 10:16 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.