मुंबई - मराठी सिनेसृष्टीचे आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या 'झुंड' चित्रपटाची बऱ्याच दिवसापासून प्रेक्षकांना आतुरता आहे. यामध्ये महानायक अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका पाहायला मिळणार आहे. अलिकडेच या चित्रपटातील त्यांचा फर्स्ट लुक प्रदर्शित करण्यात आला. तर आता या चित्रपटाचा दमदार टीझरही प्रदर्शित करण्यात आला आहे.
या चित्रपटाच्या टीझरची सुरुवात बिग बींच्या आवाजाने सुरू होते. 'झुंड ना कहीये साहब टीम कहीये टीम', असा त्यांचा डायलॉग सुरुवातीलाच ऐकायला मिळतो. तसेच, काही मुलांच्या पाठमोऱ्या आकृत्याही या टीझरमध्ये पाहायला मिळतात.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
हेही वाचा -'भूल भुलैय्या २'मध्ये दिसणार अक्षय कुमारच्या चित्रपटातील २ गाणी
नागराज मंजुळे याचा 'झुंड' चित्रपट हा फुटबॉलपटू विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित आहे. अमिताभ बच्चन त्यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटासाठी त्यांनी नागपूर येथे शूटिंग पूर्ण केले.
चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी या चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. अवघ्या २० मिनिटांपूर्वी शेअर करण्यात आलेल्या या टीझरला आत्तापर्यंत ७० हजारापेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे. तर, चाहत्यांनी बऱ्याच प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.
-
Two of the finest talents of #India - #AmitabhBachchan and #Sairaat director Nagraj Manjule - collaborate for the first time... Also, mark the release date: 8 May 2020... Teaser of #Jhund: https://t.co/fJMRZEOihe
— taran adarsh (@taran_adarsh) January 21, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Two of the finest talents of #India - #AmitabhBachchan and #Sairaat director Nagraj Manjule - collaborate for the first time... Also, mark the release date: 8 May 2020... Teaser of #Jhund: https://t.co/fJMRZEOihe
— taran adarsh (@taran_adarsh) January 21, 2020Two of the finest talents of #India - #AmitabhBachchan and #Sairaat director Nagraj Manjule - collaborate for the first time... Also, mark the release date: 8 May 2020... Teaser of #Jhund: https://t.co/fJMRZEOihe
— taran adarsh (@taran_adarsh) January 21, 2020
हेही वाचा -विजय देवरकोंडाच्या चित्रपटाची करण जोहर करणार निर्मिती, शूटिंगला सुरुवात
अमिताभ बच्चन यांनी यापूर्वी देखील चित्रपटाचे बरेच अपडेटही शेअर केले होते. मराठीमध्ये हा त्यांचा पहिलाच चित्रपट आहे. नागराज मंजुळे आणि अमिताभ बच्चन हे एकत्र आल्यामुळे आता या चित्रपटाची चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
-
T 3415 - JHUND ... झुंड !! #Jhund@Nagrajmanjule @itsBhushanKumar #KrishanKumar #RaajHiremath #SavitaRajHiremath #GargeeKulkarni #MeenuAroraa @AjayAtulOnline @tandavfilms @aatpaat @TSeries pic.twitter.com/4zB9zS5lbj
— Amitabh Bachchan (@SrBachchan) January 20, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">T 3415 - JHUND ... झुंड !! #Jhund@Nagrajmanjule @itsBhushanKumar #KrishanKumar #RaajHiremath #SavitaRajHiremath #GargeeKulkarni #MeenuAroraa @AjayAtulOnline @tandavfilms @aatpaat @TSeries pic.twitter.com/4zB9zS5lbj
— Amitabh Bachchan (@SrBachchan) January 20, 2020T 3415 - JHUND ... झुंड !! #Jhund@Nagrajmanjule @itsBhushanKumar #KrishanKumar #RaajHiremath #SavitaRajHiremath #GargeeKulkarni #MeenuAroraa @AjayAtulOnline @tandavfilms @aatpaat @TSeries pic.twitter.com/4zB9zS5lbj
— Amitabh Bachchan (@SrBachchan) January 20, 2020
भूषण कुमार, क्रिश्न कुमार, ताडव फिल्म एंटरटेन्मेंट आणि आटपाट यांच्याअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. ८ मे २०२० रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा -'झुंड' चित्रपटाच्या फर्स्ट लुकमध्ये महानायकाची दमदार झलक, पाहा फोटो