मुंबई - बिग बी अमिताभ बच्चन यांच्या आगामी 'बदला' या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. तापसी पन्नू हिची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन सुजय घोष यांनी केले आहे.
'बदला' या चित्रपटाचे यापूर्वी दोन पोस्टर रिलीज करण्यात आली होती. अमिताभ आणि तापसी यांची छबी असलेली ही दोन स्वतंत्र पोस्टर होती. ''माफ कर देना हर बार सही नही होता'' अशी ओळ या दोन्ही पोस्टर्सवर होती.
या नव्या पोस्टरची पोस्ट ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटरवर शेअर केली आहे.
'बदला' या चित्रपटाची निर्मिती गौरी खान, सुनिर खेत्रपाल आणि अक्षय पुरी यांनी केली आहे. येत्या ८ मार्च रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे.