ETV Bharat / sitara

'देसी बॉईझ'ची मैत्री पाहून भारावले चाहते, असा आहे त्यांचा 'दोस्ताना' - batla house news

अक्षय कुमारचा 'मिशन मंगल' आणि जॉन अब्राहमचा 'बाटला हाऊस' हे चित्रपट येत्या १५ ऑगस्टला प्रदर्शित होत आहेत. दोघेही सोबत त्यांच्या चित्रपटांचे प्रमोशन करत आहेत.

'देसी बॉईझ'ची मैत्री पाहून भारावले चाहते, असा आहे त्यांचा 'दोस्ताना'
author img

By

Published : Aug 10, 2019, 8:29 AM IST

मुंबई - बॉलिवूडचे 'देसी बॉईझ' अक्षय कुमार आणि जॉन अब्राहम हे बी टाऊनमधले घनिष्ठ मित्र म्हणून ओळखले जातात. मात्र, बॉक्स ऑफिसवर मागच्यावर्षी प्रमाणेच याहीवर्षी दोघांचे चित्रपट एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. मात्र, दोघेही त्यांचे व्यावसायिक आयुष्य बाजुला ठेवुन वैयक्तिक आयुष्यात आपली मैत्री सांभाळत असतात. अक्षय आणि जॉनच्या याच मैत्रीचे उदाहरण देणारे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

मागच्या वर्षी १५ ऑगस्टला अक्षय कुमारचा 'गोल्ड' आणि जॉन अब्राहमचा 'सत्यमेव जयते' हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले होते. विशेष म्हणजे दोन्हीही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. आता याहीवर्षी १५ ऑगस्टलाच दोघांचेही चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. दोघेही आपआपल्या चित्रपटांचे सोबतच प्रमोशन करत आहेत. त्यामुळे त्यांची मैत्री पाहून चाहत्यांनीही कौतुकाचा वर्षाव केला आहे.

अक्षयने जॉनसोबतचा एक फोटो शेअर करुन त्यावर 'मेक सम नॉईझ फॉर देसी बॉईझ', असे कॅप्शन दिलेय. या फोटोवरही चाहते भरभरुन प्रतिक्रिया देत आहेत.

याबाबत बोलताना अक्षय म्हणाला, की 'आम्ही एकमेकांसोबत काम करत नसलो तरीही एकमेकांसोबतच असतो. 'गरम मसाला', 'देसी बॉईझ', 'हाऊसफुल २' या चित्रपटातूनही आमच्या मैत्रीचा खरा बॉन्ड दिसला. आम्ही आमच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल फार सकारात्मक विचार करतो. म्हणूनच येत्या स्वातंत्र्यदिनी दोघेही आपआपल्या चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहोत'.

अक्षय कुमारचा 'मिशन मंगल' आणि जॉन अब्राहमचा 'बाटला हाऊस' हे चित्रपट येत्या १५ ऑगस्टला प्रदर्शित होत आहेत. आता या चित्रपटांना प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे रंजक ठरेल.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.