मुंबई - बॉलिवूड अभिनेते संजय मिश्रा यांची मुख्य भूमिका असलेल्या 'कामयाब' चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला आहे. शाहरुख खानच्या रेड चिलिज अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. चित्रपटाच्या ट्रेलरवर नेटकऱ्यांनी भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता अजय देवगननेही या ट्रेलरवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. संजय मिश्रा यांनी त्याच्यासोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये अजय देवगन संजय मिश्रा यांच्यासोबत संवाद साधताना दिसतो. 'मी माझ्या करिअरमध्ये फक्त १०० भूमिका साकारल्या आहेत. पण, संजय मिश्रा यांनी एकाच चित्रपटात ४९९ भूमिका साकारण्याचे काम केले आहे. आता ५०० वी भूमिका आपण सोबत साकारू', असे अजय देवगन संजय मिश्रा यांना म्हणतो.
-
This is called one big family @iamsrk is presenting, @ajaydevgn is supporting , and thank you audience for loving the #KaamyaabTrailer 🙂🙏 Picture अभी बाकी है , looking forward to all your love and support #Kaamyaab pic.twitter.com/7df5YwqhMT
— Sanjay Mishra (@imsanjaimishra) February 20, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">This is called one big family @iamsrk is presenting, @ajaydevgn is supporting , and thank you audience for loving the #KaamyaabTrailer 🙂🙏 Picture अभी बाकी है , looking forward to all your love and support #Kaamyaab pic.twitter.com/7df5YwqhMT
— Sanjay Mishra (@imsanjaimishra) February 20, 2020This is called one big family @iamsrk is presenting, @ajaydevgn is supporting , and thank you audience for loving the #KaamyaabTrailer 🙂🙏 Picture अभी बाकी है , looking forward to all your love and support #Kaamyaab pic.twitter.com/7df5YwqhMT
— Sanjay Mishra (@imsanjaimishra) February 20, 2020
हेही वाचा -संजय मिश्रांचा अतरंगी थाट, 'कामयाब'चं नवं पोस्टर प्रदर्शित
संजय मिश्रा यांनी त्याच्यासोबत आपल्या चित्रपटातील 'एंजॉइंग लाईफ और ऑप्शन ही क्या है' हा डायलॉगही यावेळी म्हटला. संजय मिश्रा यांनी हा व्हिडिओ पोस्ट करुन यामध्ये लिहलंय, की 'याला म्हणतात मोठं कुटुंब. शाहरुख खानची प्रस्तुती असलेल्या चित्रपटाला अजय देवगनने पाठिंबा दिला आहे. 'कामयाब'च्या ट्रेलरलाही सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळाल्याने त्यांनी चाहत्यांचे आभार मानले आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
६ मार्चला 'कामयाब' चित्रपट सिनेमागृहात दाखल होत आहे. संजय मिश्रासोबत दीपक डोब्रियालची देखील महत्वपूर्ण भूमिका पाहायला मिळणार आहे.