ETV Bharat / sitara

पाहा : सनी लिओनसह बॉलिवूडच्या सौंदर्यवती अभिनेत्री कॅमेऱ्यात झाल्या कैद - सनी लिओनी

बॉलिवूडच्या सौंदर्यवती अभिनेत्री कृती खरबंदा, उर्वशी रौतेला, पूजा हेगडे आणि सनी लिओन यांना मुंबई आणि परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी हौशी फोटोग्राफर्सनी आपल्या कॅमेऱ्यात बंद केले.

bollywood divas spotted
बॉलिवूडच्या सौंदर्यवती अभिनेत्री
author img

By

Published : Jun 15, 2021, 5:03 PM IST

मुंबई - लॉकडाउनवरील निर्बंध कमी झाल्यानंतर मुंबईत पुन्हा उर्जा मिळवण्यासाठी वेगवान पाऊले उचलली जात आहेत. बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री सोमवारी मुंबई परिसरात कामानिमित्य फिरताना आढळून आल्या. त्यांना हौशी फोटोग्राफर्सनी आपल्या कॅमेऱ्यात बंद केले आहे.

अभिनेत्री सनी लिओनला तिच्या मुलांसह मुंबईच्या अंधेरी भागात स्पॉट केले होते. आपल्या मुलांबरोबर फिरताना तिने आपला लूक अत्यंत साधा ठेवला होता. दिग्दर्शक लव रंजनच्या ऑफिसच्या बाहेर अभिनेत्री कृती खरबंदाला क्लिक करण्यात आले. बेजॉय नाम्बियार दिग्दर्शित ‘तैश’ या सूड नाट्य चित्रपटात कृती अखेरची दिसली होती. तिचा आगामी '१४ फेरे' हा चित्रपट देवांशू सिंग यांनी दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट एक समकालीन सामाजिक विनोदी चित्रपट असून यात तिची विक्रांत मस्सेच्यासोबत जोडी आहे.

बॉलिवूडच्या सौंदर्यवती अभिनेत्री

दरम्यान, फिटनेस उत्साही उर्वशी रौतेला जिमच्या बाहेर स्पॉट झाली. ती रणदीप हूडाची प्रमुख भूमिका असलेल्या 'इन्स्पेक्टर अविनाश' या आगामी वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने तिच्या ट्रेनरसोबत जिममध्ये वर्कआऊट करताना एक व्हिडिओ शेअर केला होता.

पूजा हेगडे देखील प्रभासची मुख्य भूमिका असलेल्या आगामी 'राधे श्याम' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहे. तेलुगू, तामिळ, हिंदी, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणारा हा चित्रपट यावर्षी ३० जुलैला पडद्यावर झळकणार आहे. राधा कृष्ण कुमार यांनी हा भव्य चित्रपट दिग्दर्शित केला आहे.

हेही वाचा - कंगनाच्या पासपोर्ट नुतनीकरणासंदर्भातील याचिकेवरील सुनावणी २५ जूनपर्यंत तहकूब

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.